नच्चिपन समितीच्या शिफारसी लागू करा

By admin | Published: September 25, 2016 01:47 AM2016-09-25T01:47:01+5:302016-09-25T01:47:01+5:30

ओबीसींच्या उत्थानासाठी नच्चिपन समितीच्या शिफारशी लागू करण्यात याव्या, गडचिरोली जिल्ह्यातील ओबीसींचे आरक्षण पूर्ववत करावे,

Apply the recommendations of Nachippan Committee | नच्चिपन समितीच्या शिफारसी लागू करा

नच्चिपन समितीच्या शिफारसी लागू करा

Next

ओबीसींचा मेळावा : जिल्ह्यात विधानसभेसाठीही ओबीसीला संधी मिळावी
चामोर्शी : ओबीसींच्या उत्थानासाठी नच्चिपन समितीच्या शिफारशी लागू करण्यात याव्या, गडचिरोली जिल्ह्यातील ओबीसींचे आरक्षण पूर्ववत करावे, ओबीसींना जिल्ह्यातून विधानसभेची जागा आरक्षित करावी, यासह ओबीसींच्या विविध मागण्यांसाठी मोठे आंदोलन उभे करण्याकरिता चामोर्शी येथे ओबीसी समाज संघटनेच्या वतीने ओबीसींचा विशाल मेळावा शनिवारी घेण्यात आला.
यावेळी मंचावर प्रमुख वक्ते म्हणून ओबीसी फेडरेशनचे संयोजक बळीराज धोटे होते. अध्यक्षस्थानी प्रा. राम वासेकर, विशेष अतिथी म्हणून अशोक मांदाळे, नगर पंचायतीचे उपाध्यक्ष राहूल नैताम, पं.स. सभापती शशिकला चिळंगे, उपसभापती मंदा दुधबावरे, पं.स. सदस्य प्रमोद भगत, जि.प. सदस्य संध्या दुधबळे, सोनाली वरगंटीवार, पं.स. सदस्य केशव भांडेकर, सुरेंद्र सोमनकर, नुमचंद भिवनकर, भाजपचे चामोर्शी तालुका अध्यक्ष दिलीप चलाख, प्रा. रमेश बारसागडे, कालिदास बुरांडे, तेली समाज संघाचे गजानन भांडेकर, कुणबी समाज संघाचे गोहणे, माळी समाज संघाचे सुनिल कावळे, पांचाळ समाज संघाचे कागदेलवार तसेच नगर पंचायतीचे सभापती विजय शात्तलवार, नगरसेवक वैभव भिवापुरे अवी चौधरी, प्रशांत एगलोपवार आदी मान्यवर उपस्थित होते.
याप्रसंगी बळीराज धोटे म्हणाले, गडचिरोली जिल्ह्यासह महाराष्ट्रातील ओबीसी लोकांवर शासनकर्त्यांकडून प्रचंड अन्याय होत आहे. ओबीसी समाजाने आरक्षणासाठी रस्त्यावर उतरून मोठे आंदोलन करणे आवश्यक आहे. त्यासाठी ओबीसींची संघटना मजबूत झाली पाहिजे, असे धोटे यावेळी म्हणाले. याप्रसंगी प्रा. राम वासेकर यांनीही मार्गदर्शन केले.
यशस्वीतेसाठी मारोती दुधबावरे, दिनेश चुधरी, सदाशिव मेश्राम, बोबाटे, कुनघाडकर, आदे, जुवारे, भोवरे, बारसागडे, ठाकरे यांनी सहकार्य केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मारोती दुधबावरे, संचालन गोकुलदास झाडे यांनी केले तर आभार कालिदास बुरांडे यांनी मानले.
छत्रपती शिवरायांचा द्वितीय राज्यभिषेक दिन, सत्यशोधक समाजस्थापना दिन व पेरियार रामास्वामी जयंतीचे औचित्य साधून ओबीसी समाज संघटना चामोर्शीच्या वतीने नगर पंचायत भवनात घेण्यात आलेल्या सदर प्रबोधन कार्यक्रमास चामोर्शी शहरासह तालुक्यातील ओबीसी बांधव, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)

Web Title: Apply the recommendations of Nachippan Committee

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.