काँग्रेसतर्फे समन्वयकांच्या नियुक्त्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2021 04:43 AM2021-09-14T04:43:30+5:302021-09-14T04:43:30+5:30
गडचिराेली : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या सूचनेनुसार गावपातळीवर ग्राम काँग्रेसची स्थापना व बुथ कमिट्या स्थापन करण्यासाठी जिल्हा समन्वयक म्हणून ...
गडचिराेली : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या सूचनेनुसार गावपातळीवर ग्राम काँग्रेसची स्थापना व बुथ कमिट्या स्थापन करण्यासाठी जिल्हा समन्वयक म्हणून माजी जिल्हाध्यक्ष हसनअली गिलानी यांची नेमणूक प्रदेश काँग्रेस कमिटीतर्फे झाली आहे. त्याअनुषंगाने जिल्ह्यात तालुका व शहर समन्वयकांच्या तसेच तालुकाप्रभारींच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. यातून गाव व बुथस्तरावर पक्षाचे संघटन मजबूत करण्यावर भर देण्यात येणार आहे.
गडचिराेली तालुका समन्वयकपदी दिवाकर मिसार तर गडचिराेली शहर समन्वयक म्हणून राकेश रत्नावार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. चामाेर्शी शहर समन्वयकपदी वैभव भिवापुरे, तालुका समन्वयक म्हणून राजेश ठाकूर (दक्षिण विभाग), अनिल काेठारे (उत्तर विभाग), धानाेरा तालुका समन्वयक म्हणून विनाेल लेनगुरे, आरमाेरी तालुका समन्वयक अशाेक वाकडे, आरमाेरी शहर समन्वयक शालिक पत्रे, वडसा तालुका समन्वयक म्हणून नितीन राऊत, शहर समन्वयक पिंकू बावणे, कुरखेडा तालुका समन्वयक जीवन नाट, शहर समन्वयक आशा तुलावी, काेरची तालुका समन्वयक परमेश्वर लाेहंबरे, अहेरी तालुका समन्व्यक हुसैन खान माेहम्मद पठाण, शहर समन्वयक पप्पू हकीम, एटापल्ली तालुका समन्वयक निजाम पेंदाम, शहर समन्वयक किसन हिचामी, सिराेंचा तालुका समन्वयक कुमरी सडवली, शहर समन्वयक म्हणून शंकर पेंचम मंचर्ला, भामरागड तालुका समन्वयक लक्ष्मीकांत बाेगामी, शहर समन्वयक राजू वड्डे तसेच मुलचेरा तालुका समन्वयक म्हणून सुवर्णा येलमुलवार यांची निवड करण्यात आली आहे.
बाॅक्स....
विधानसभानिहाय तालुका प्रभारी
आरमाेरी, गडचिराेली व अहेरी या तीनही विधानसभा क्षेत्रात एकूण १२ तालुका प्रभारींची नियुक्ती करण्यात आली आहे. यामध्ये आरमाेरी विधानसभा क्षेत्रात आरमाेरी तालुका प्रभारी म्हणून एन. झेड. कुमरे, देसाईगंज- दाैलत धुर्वे, काेरची- प्रभाकर तुलावी, कुरखेडा- तेजस मडावी, गडचिराेली विधानसभा क्षेत्रातील चामाेर्शी-प्रभाकर वासेकर, काशिनाथ भडके तसेच धानाेरा तालुका प्रभारी म्हणून ललीत बरच्छा, लहुकुमार रामटेके आणि गडचिराेली तालुका प्रभारी म्हणून श्रीनिवास दुलमवार यांचा समावेश आहे. अहेरी विधानसभा क्षेत्रातील भामरागड-समशेर खाॅ पठाण, संदीप पंदिलवार, मुलचेरा-नीलकंठ निखाडे, एटापल्ली-प्रमाेद भगत व सिराेंचा- पंकज पस्पुलवार आदींचा समावेश आहे.