२७५ काेटींच्या जिल्हा वार्षिक आराखड्यास मंजुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2021 04:40 AM2021-02-09T04:40:00+5:302021-02-09T04:40:00+5:30

लाेकमत न्यूज नेटवर्क गडचिरोली : पुढील वर्षीच्या ग्रामीण विकासासाठी गडचिराेली जिल्ह्याच्या ठरविलेल्या १८७ कोटी पाच लाख रुपयांच्या सूत्रापेक्षा ...

Approval of district annual plan of 275 girls | २७५ काेटींच्या जिल्हा वार्षिक आराखड्यास मंजुरी

२७५ काेटींच्या जिल्हा वार्षिक आराखड्यास मंजुरी

Next

लाेकमत न्यूज नेटवर्क

गडचिरोली : पुढील वर्षीच्या ग्रामीण विकासासाठी गडचिराेली जिल्ह्याच्या ठरविलेल्या १८७ कोटी पाच लाख रुपयांच्या सूत्रापेक्षा अतिरिक्त ८८ कोटी रुपये मंजूर करीत २७५ कोटी रुपयांच्या आराखड्यास मंजुरी देण्यात आली. मात्र पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेली ३२० कोटी रुपयांच्या अतिरिक्त मागणीबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासमवेत बैठक घेऊन त्याबाबत सकारात्मक निर्णय घेऊ, अशी ग्वाही राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी दिली. नागपूर विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात साेमवारी राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय जिल्हा वार्षिक योजना नियोजन आराखडा अंतिम करण्यासंदर्भात गडचिरोली जिल्ह्याची बैठक पार पडली यावेळी ते बोलत होते.

बैठकीला नगरविकासमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे, जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार, आ.धर्मरावबाबा आत्राम, आ.डॉ.देवराव होळी, आ.कृष्णा गजबे, वित्त व नियोजन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव देबाशीष चक्रवर्ती, जिल्हाधिकारी दीपक सिंगला, पोलीस अधीक्षक अंकित गोयल, मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशीर्वाद व जिल्हा नियोजन अधिकारी तेजबहादूर तिडके उपस्थित होते.

अतिरिक्त मागणीबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत मुंबईला बैठक घेऊन चर्चा करू आणि त्याबाबत सकारात्मक निर्णय घेऊ, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बैठकीत सांगितले. यावेळी जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांनी जिल्ह्याच्या विकासासाठी क्षेत्रनिहाय लागणाऱ्या अतिरिक्त निधीची कारणासहीत माहिती दिली. या बैठकीला जिल्ह्यातील अंमलबजावणी यंत्रणांचे प्रमुख अधिकारीही उपस्थित होते.

Web Title: Approval of district annual plan of 275 girls

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.