下आरमोरीत载 समाजकल्याण विभागाचे वसतिगृह मंजूर करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2021 04:25 AM2021-06-29T04:25:02+5:302021-06-29T04:25:02+5:30
आरमोरी : येथे विद्यालयीन, महाविद्यालयीन व पदव्युत्तर शिक्षणासाठी बाहेरगावावरून येणाऱ्या २०० विद्यार्थ्यांकरिता समाजकल्याण विभागामार्फत वसतिगृह ...
आरमोरी : येथे विद्यालयीन, महाविद्यालयीन व पदव्युत्तर शिक्षणासाठी बाहेरगावावरून येणाऱ्या २०० विद्यार्थ्यांकरिता समाजकल्याण विभागामार्फत वसतिगृह मंजूर करून निधी उपलब्ध करावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे आरमोरी विधानसभा क्षेत्र अध्यक्ष शरद सोनकुसरे व अन्य पदाधिकाऱ्यांनी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्याकडे केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, गडचिरोली जिल्हा शैक्षणिकदृष्ट्या मागास आहे. जिल्ह्यात आरमोरी हे शैक्षणिक वारसा लाभलेले शहर आहे. येथे महाविद्यालयीन शिक्षणासोबतच पदव्युत्तर शिक्षणाची सोय आहे. त्यामुळे गडचिरोली जिल्ह्यातील धानोरा, कुरखेडा, कोरची, देसाईगंज, चामोर्शी, गडचिरोली, आष्टी, ब्रह्मपुरी, नागभीड व अन्य तालुक्यातील अनेक विद्यार्थी शिक्षणासाठी आरमोरी येथे येतात. मात्र समाजकल्याण विभागाचे वसतिगृह नसल्याने आरमोरी येथे लांबवरून शिक्षणासाठी येणाऱ्या गरीब होतकरू विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणात हेळसांड होत आहे. शिवाय भाड्याने खाेली घेऊन शिक्षण घेणे गरीब विद्यार्थ्यांना परवडण्यासारखे नाही.
आरमोरी येथे वसतिगृह उभारल्यास गरीब विद्यार्थ्यांना शारीरिक, मानसिक त्रास कमी हाेईल व आर्थिक भुर्दंड बसणार नाही. शिवाय अभ्यासासोबत स्पर्धा परीक्षेची तयारी सुद्धा करता येईल. त्यामुळे आरमोरी येथे समाजकल्याण विभागाचे २०० विद्यार्थी क्षमतेचे वसतिगृह मंजूर करून निधी उपलब्ध करावा. तसेच ग्रंथालय, वाचनालय व योग्य मार्गदर्शक उपलब्ध करून द्यावेत, अशी मागणी शरद सोनकुसरे, आरमोरी शहराध्यक्ष अमीन लालानी व अन्य कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्याकडे निवेदनातून केली आहे.
===Photopath===
280621\img-20210628-wa0023.jpg
===Caption===
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आरमोरी विधानसभा अध्यक्ष शरद सोनकुसरे यांचा फोटो