गावठी दारूच्या हातभट्टीवर आरमोरी पोलिसांची धाड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2020 06:00 AM2020-03-09T06:00:00+5:302020-03-09T06:00:27+5:30
लक्षमणसिंग गोविंदसिंग जुनी हा मोहफुलांची दारू गाळत आहे , अशी माहिती आरमोरी पोलिसांना प्राप्त झाली. या माहितीच्या आधारे जंगलात असलेल्या दारू भट्टीवर धाड टाकली. जवळच असलेल्या तणसीच्या ढगात जवळपास सहा मोहफुल भरलेले पोते आढळून आले. पोलिसांची चाहूल लागताच आरोपी पसार झाला आहे. पोलिसांनी दारूभट्टी नष्ट केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
आरमोरी : स्थानिक पोलिसांनी शहरापासून सहा किमी अंतरावर असलेल्या रवी येथील जंगलातील मोहफुलाच्या हातभट्टीवर धाड टाकून सुमारे ८० हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. सदर कारवाई रविवारी सकाळी ११ वाजता करण्यात आली.
लक्षमणसिंग गोविंदसिंग जुनी हा मोहफुलांची दारू गाळत आहे , अशी माहिती आरमोरी पोलिसांना प्राप्त झाली. या माहितीच्या आधारे जंगलात असलेल्या दारू भट्टीवर धाड टाकली. जवळच असलेल्या तणसीच्या ढगात जवळपास सहा मोहफुल भरलेले पोते आढळून आले. पोलिसांची चाहूल लागताच आरोपी पसार झाला आहे. पोलिसांनी दारूभट्टी नष्ट केली. सदर कारवाई सपोनि चेतनसिंग चौहान, पोलिस उप निरीक्षक कांचन उईके, पोलीस हवालदार आनंदराव गलबले, नरेश वासेकर, पोलीस कॉन्स्टेबल ज्ञानेश्वर सिडाम, उमेश ताटपलान, दिनेश कुथे, देवराव केळझरकर यांनी सदर ठिकाणी छापा घालून केली. होळी व धुलीवंदन सणाच्या निमित्ताने मोठ्या प्रमाणात दारू काढली जाण्याची शक्यता असल्याने पोलिसांनी धाडसत्र सुरू केले आहे. दारूची वाहतूक करणाऱ्यांचीही माहिती काढली जात आहे. आरमोरी तालुक्यात मोठ्या प्रमाणात मोहफुलाची दारू काढले जाते. पोलिसांनी आता त्यांच्या विरोधात धाडसत्र सुरू करण्याची मोहीम हाती घेतली आहे.
देसाईगंज येथे तीन लाख रूपयांची दारू जप्त
देसाईगंज : पोलिसांनी आरमोरी मार्गावर सापळा रचून २ लाख ८८ हजार रुपयांची दारू व पाच लाख रूपये किमतीचे वाहन असा एकूण ७ लाख ८८ हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. यातील दोनही आरोपी मात्र फरार झाले आहेत. गोंदिया जिल्ह्यातून पांढºया रंगाचे चारचाकी वाहनाने अवैधरित्या दारूची वाहतुक होत असल्याची माहिती देसाईगंज पोलिसांना प्राप्त झाली. प्राप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी संशयास्पद स्थितीत नमुद वर्णनाचे चारचाकी वाहन आरमोरीकडे जाताना आढळून आल्याने वाहन चालकास वाहन थांबविण्याचा इशारा केला असता, चालकाने वाहन थांबवून पळ काढला. या वाहनाची तपासणी केली असता त्यात देशी दारूच्या ९० मिली मापाच्या दारू बॉटल असलेले खरड्याचे ३६ बॉक्स आढळून आले. त्याची किंमत २ लाख ८८ हजार रुपये व वाहनाची किंमत ५ लाख रुपये, असा एकुण ७ लाख ८८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. दोन अज्ञात आरोपींविरोधात देसाईगंज पोलीस स्टेशनमध्ये महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम सह कलम १८४ तसेच मोटार वाहन कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. सदर कारवाई देसाईगंज पोलीस निरीक्षक प्रदिप लांडे यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक हर्षल नगरकर, पोहवा वासुदेव अलोणे, पोशी गुरुदेव चौधरी, चालक पोहवा देवानंद तोडासे यांनी केली. या कारवाईमुळे दारू विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहेत.