चेतन बनणार सैन्यदलाचा अधिकारी
By admin | Published: May 24, 2014 11:35 PM2014-05-24T23:35:32+5:302014-05-24T23:35:32+5:30
वयाच्या तिसर्या वर्षीच येथील चेतन लालाजी सोरते याचे पितृछत्र हरपल्यानंतर चेतनची आई किरण चेतनच्या पाठीशी ठामपणे उभी राहिली. रक्ताचे पाणी करून चेतनला गोंडवाना सैनिक विद्यालयात शिकविले. अखेर
भीमराव मेo्राम - जोगीसाखराo्रेय आई किरण सोरते, आजोबा खुशाल सोरते यांना दिले आहे. वयाच्या तिसर्या वर्षीच येथील चेतन लालाजी सोरते याचे पितृछत्र हरपल्यानंतर चेतनची आई किरण चेतनच्या पाठीशी ठामपणे उभी राहिली. रक्ताचे पाणी करून चेतनला गोंडवाना सैनिक विद्यालयात शिकविले. अखेर तिच्या कष्टाचे सोने झाले असून चेतनने सैन्य दलाची परीक्षा पास केली आहे. त्यामुळे अधिकारी बनण्याचा त्याचा मार्ग मोकळा झाला आहे. चेतन हा जोगीसाखरावासीयांसाठीच नाही तर संपूर्ण जिल्ह्यासाठी भूषण ठरला आहे. घरची परिस्थिती बेताची असतानाही चेतनला चांगल्या दर्जाचे शिक्षण त्याला मोठे करण्याचा निर्णय चेतनचे वडील लालाजी सोरते व आई किरण सोरते यांनी घेतला होता. मात्र लालाजी हे स्वप्न पूर्ण करू शकले नाहीत. चेतन अवघ्या तीन वर्षाचा असतानाच लालाजी सोरते यांचा मृत्यू झाला. घरचा कमविता व्यक्ती गेल्याने सोरते कुटुंबावर मोठे आर्थिक संकट कोसळले मात्र या संकटाला न घाबरता चेतनची आई चेतनच्या पाठीशी ठामपणे उभी राहिली. चेतनच्या वडीलाने पाहिलेले स्वप्न साकार करण्यासाठी चेतनला गडचिरोली येथील गोंडवाना सैनिकी विद्यालयात शिकविले. सैनिकी विद्यालयाचा खर्च भागविताना किरणला अनेक अडचणींचा सामना करावा लागला. तरीही ती डळमळली नाही. चेतनने नेसची परीक्षा पास केली आहे. यासाठी ८0 विद्यार्थी घेतली जातात. त्यापैकी चेतनचा क्रमांक २२ वा आहे. त्यामुळे नेसमध्ये अधिकारी होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. चेतनने लहानशा वयात अनेक पुरस्कार प्राप्त केले आहेत. तो जोगीसाखरा व जिल्ह्यासाठी भूषण ठरला आहे. त्याने आपल्या यशाचे