आरमोरीत ७४ टक्के मतदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2019 01:05 AM2019-01-28T01:05:17+5:302019-01-28T01:06:29+5:30

आरमोरी नगर परिषदेसाठी रविवारी मतदान झाले. सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत आठही प्रभागांमध्ये सरासरी ७३.६९ टक्के एवढे मतदान झाले. बहुतांश प्रभागांचे मतदान ६५ ते ७५ टक्केच्या दरम्यान आहेत.

Around 74 percent polling | आरमोरीत ७४ टक्के मतदान

आरमोरीत ७४ टक्के मतदान

Next
ठळक मुद्देनगर परिषदेची निवडणूक : दुपारी १ वाजेपर्यंत मतदान केंद्रांवर होता शुकशुकाट

लोकमत न्यूज नेटवर्क
आरमोरी : आरमोरी नगर परिषदेसाठी रविवारी मतदान झाले. सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत आठही प्रभागांमध्ये सरासरी ७३.६९ टक्के एवढे मतदान झाले. बहुतांश प्रभागांचे मतदान ६५ ते ७५ टक्केच्या दरम्यान आहेत. केवळ प्रभाग क्रमांक ७ मध्ये ९०.७९ टक्के मतदान झाले. स्थानिक निवडणूक असल्याने प्रत्येक प्रभागाचे मतदान ९० टक्क्यांच्या वर राहिल, असा अंदाज होता. मात्र हा अंदाज खोटा ठरला. सोमवारी सकाळी १० वाजेपासून तहसील कार्यालयात मतमोजणीला सुरूवात होणार आहे.
सकाळी ७.३० वाजेपासून मतदानाला सुरूवात झाली. परंतु ढगाळ वातावरण व रविवारचा दिवस असल्याने दुपारी १२ वाजेपर्यंत मतदान केंद्रांवर फारशी गर्दी दिसून येत नव्हती. ११.३० वाजेपर्यंत केवळ १७.५८ टक्के व दुपारी ३१.३० वाजेपर्यंत ३४.७६ टक्के मतदान झाले. त्यानंतर मतदान वाढण्यास सुरूवात झाली. हळूहळू मतदान केंद्रांवर मतदारांच्या रांगा दिसू लागल्या. दुपारी ३.३० वाजेपर्यंत ५४.२३ टक्के मतदान झाले. काही मतदार सायंकाळी ५ वाजता मतदान केंद्रावर पोहोचले. त्यामुळे सायंकाळच्या सुमारास मात्र काही मतदान केंद्रांवर गर्दी दिसून येत होती.
अरसोडा येथील मतदान केंद्राबाहेर थोडीफार गडबड निर्माण झाली. तेव्हा पोलिसांनी या ठिकाणी मोठा बंदोबस्त लावला. त्यामुळे गावाला पोलीस छावणीचे स्वरूप प्राप्त झाले होते. अरसोडातील ही घटना वगळता आरमोरी शहरातील मतदान अतिशय शांततेत पार पडले. नगराध्यक्ष पदासाठी आठ तर नगरसेवकांच्या १७ जागांसाठी आठ प्रभातून एकूण ९८ उमेदवार रिंगणात आहेत.

Web Title: Around 74 percent polling

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.