तालुकास्तरावर भरारी पथक नेमणार

By admin | Published: June 6, 2017 12:49 AM2017-06-06T00:49:46+5:302017-06-06T00:49:46+5:30

जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी भरारी पथक स्थापन करून कोटपा कायद्याची १०० टक्के अंमलबजावणी केली जाणार आहे.

To arrange a flying squad at taluka level | तालुकास्तरावर भरारी पथक नेमणार

तालुकास्तरावर भरारी पथक नेमणार

Next

पोलीस अधीक्षकांची माहिती : कोटपा कायद्याची अंमलबजावणी होणार
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी भरारी पथक स्थापन करून कोटपा कायद्याची १०० टक्के अंमलबजावणी केली जाणार आहे. या माध्यमातून जिल्हा तंबाखूमुक्त करणार असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी दिली.
जागतिक तंबाखू नकार दिनानिमित्त पोलीस मुख्यालय व जिल्हा सामान्य रूग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने पोलीस मुख्यालयात कोटपा ( सिगारेट व अन्य तंबाखूजन्य पदार्थ नियंत्रण कायदा २०१३ ) विषयी प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. यावेळी डॉ. देशमुख बोलत होते.
कार्यशाळेला जिल्हा सल्लागार डॉ. कैलास नगराळे यांनी कोटपा कायद्याबद्दल जिल्ह्यातील सर्व पोलीस अधिकाऱ्यांना व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे माहिती दिली. कार्यशाळेच्या आयोजनासाठी गृह विभागाचे पोलीस उपअधीक्षक गणेश बिरादार, जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. प्रमोद खंडाते, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक यशवंत नलावडे, पीएसआय सुनील इंगळे, चौधरी, श्रीनिवास संगोजी, विश्वनाथ उडाण, दिनेश खोरगडे यांनी सहकार्य केले.

Web Title: To arrange a flying squad at taluka level

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.