मार्र्कं डा यात्रेसाठी नियोजन पूर्ण
By admin | Published: January 6, 2016 01:55 AM2016-01-06T01:55:31+5:302016-01-06T01:55:31+5:30
६ मार्चपासून मार्र्कं डा येथे महाशिवरात्रीनिमित्त यात्रेला प्रारंभ होत आहे. या यात्रेच्या नियोजनाचे काम प्रशासनाने सुरू केले असून सोमवारी मार्र्कंडा येथे पूर्वनियोजन बैठक घेण्यात आली.
महाशिवरात्रीला यात्रा : डिझेलच्या दिव्यांनी परिसर होणार प्रकाशमान
चामोर्शी : ६ मार्चपासून मार्र्कं डा येथे महाशिवरात्रीनिमित्त यात्रेला प्रारंभ होत आहे. या यात्रेच्या नियोजनाचे काम प्रशासनाने सुरू केले असून सोमवारी मार्र्कंडा येथे पूर्वनियोजन बैठक घेण्यात आली. या बैठकीला अध्यक्षस्थानी उपविभागीय अधिकारी जी. एम. तळपादे होते.
यावेळी आपत्ती व्यवस्थापन अधिकारी कृष्णा रेड्डी, मार्र्कंडेश्वर देवस्थानचे अध्यक्ष गजानन भांडेकर, उपाध्यक्ष मनोज पालारपवार, सचिव मृत्यूंजय गायकवाड, सहसचिव रामुजी तिवाडे, कोषाध्यक्ष पा. गो. पांडे, रामप्रसाद महाराज, धर्मशाळेचे सचिव केशव आंबटवार, तहसीलदार यू. जी. वैद्य, नायब तहसीलदार देवेंद्र दहिकर, वनपरिक्षेत्राधिकारी अभय ताल्हन, पोलीस उपनिरीक्षक माने, महावितरण कंपनीचे उपविभागीय अभियंता डी. बी. कुंभरे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. किशोर ताराम, बांधकाम विभागाचे अभियंता गावळ, कक्ष अधिकारी वि. रा. कागदेलवार, मार्र्कंडाच्या सरपंच ललीता मरस्कोल्हे, रेवनाथ कुसराम, साईनाथ बुरांडे, जयराम चलाख, दिलीप चलाख, मंडल अधिकारी बोदलकर, तलाठी शेडमाके, भरडकर, ग्रा. पं. सचिव दिनेश सराटे आदी उपस्थित होते.
यात्रेच्या संदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्त्याची दुरूस्ती करावी, ग्रामपंचायतकडून शुद्ध पाणी उपलब्ध होण्याबाबत नियोजन करण्यात यावे, आरोग्य विभागाकडून यात्राकाळात २४ तास आरोग्य सेवा तसेच महावितरण कंपनीकडून विद्युत पुरवठ्याची व्यवस्था सुरळीत ठेवण्याबाबत नियोजन पूर्ण करण्यात यावे, असे निर्देश वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिले. तसेच यात्राकाळात अधिक बसगाड्यांची व्यवस्था तसेच आपत्ती व्यवस्थापनाकडून डिझेलवर चालणारे १० दिवे ज्यामुळे संपूर्ण मार्र्कं डानगरी प्रकाशमान होईल, अशी व्यवस्था करण्यात येणार आहे. ग्रामपंचायतीकडून स्वच्छतेची जबाबदारी पार पाडली जाणार असून जि. प. व पं. स. प्रशासनाकडून मोबाईल, शौचालय, बाथरूम यांची व्यवस्था करण्यात येणार आहे, आदीबाबत या बैठकीत चर्चा करण्यात आली. १४ जानेवारीला नियोजनाची दुसरी बैठक घेतली जाणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. (शहर प्रतिनिधी)