एटापल्लीत मतमाेजणीसाठी सात टेबलची व्यवस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2021 04:33 AM2021-01-22T04:33:25+5:302021-01-22T04:33:25+5:30

लाेकमत न्यूज नेटवर्क एटापल्ली : तालुक्यातील १४ ग्रामपंचायतींची निवडणूक २० जानेवारीला पार पडली. या निवडणुकीच्या मतदानाची व्यवस्था करण्यासाठी पाेलीस ...

Arrangement of seven tables for counting of votes in Etapalli | एटापल्लीत मतमाेजणीसाठी सात टेबलची व्यवस्था

एटापल्लीत मतमाेजणीसाठी सात टेबलची व्यवस्था

Next

लाेकमत न्यूज नेटवर्क

एटापल्ली : तालुक्यातील १४ ग्रामपंचायतींची निवडणूक २० जानेवारीला पार पडली. या निवडणुकीच्या मतदानाची व्यवस्था करण्यासाठी पाेलीस व कर्मचाऱ्यांना बरीच कसरत करावी लागली. नक्षलग्रस्त व अतिसंवेदनशील भागात पाेहाेचण्याकरिता २५ ते ४० किमीची पायपीट कर्मचाऱ्यांनी केली. अशास्थितीत १४ ही ग्रामपंचायतींची मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली. २१ जानेवारीला दुपारी ४ वाजेपर्यंत हेलिकाॅप्टरने ईव्हीएम एटापल्लीत पाेहाेचविण्यात आल्या. विशेष म्हणजे सर्वच बुथवर ४८ टक्क्यांवर मतदान झाले. काही ठिकाणी सुरक्षेच्या कारणावरून बुथची संख्या कमी करण्यात आली हाेती. तरीसुद्धा घनदाट जंगलातून कर्मचाऱ्यांना बुथवर पाेहाेचण्यासाठी व तेथून पुन्हा तालुका मुख्यालयात येण्यासाठी बरीच कसरत करावी लागली. २२ जानेवारीला तालुका मुख्यालयात १४ ग्रामपंचायतींची मतमाेजणी सात टेबलवरून करण्यात येणार आहे.

Web Title: Arrangement of seven tables for counting of votes in Etapalli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.