पायलच्या मारेकऱ्यांना अटक करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2019 12:30 AM2019-05-29T00:30:11+5:302019-05-29T00:33:16+5:30

मुंबई येथील नायर हॉस्पिटलमधील प्रसूतीशास्त्र विभागात पदव्यूत्तर वैद्यकीय शिक्षण घेणाºया डॉ.पायल तडवी यांना आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्यांना तत्काळ अटक करावी, अशी मागणी वंचित आघाडी व भारिप बहुजन महासंघाच्या शिष्टमंडळाने निवासी जिल्हाधिकारी यांच्या मार्फत नायर हॉस्पिटल व वैद्यकीय महाविद्यालयाचे डीन यांना पाठविलेल्या निवेदनातून केली आहे.

Arrest Payal's killers | पायलच्या मारेकऱ्यांना अटक करा

पायलच्या मारेकऱ्यांना अटक करा

Next
ठळक मुद्देउपजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन : आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : मुंबई येथील नायर हॉस्पिटलमधील प्रसूतीशास्त्र विभागात पदव्यूत्तर वैद्यकीय शिक्षण घेणाºया डॉ.पायल तडवी यांना आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्यांना तत्काळ अटक करावी, अशी मागणी वंचित आघाडी व भारिप बहुजन महासंघाच्या शिष्टमंडळाने निवासी जिल्हाधिकारी यांच्या मार्फत नायर हॉस्पिटल व वैद्यकीय महाविद्यालयाचे डीन यांना पाठविलेल्या निवेदनातून केली आहे.
डॉ.पायल तडवीच्या आत्महत्येस तीन डॉक्टर जबाबदार आहेत. त्यांना सेवेतून बडतर्फ करावे, महाराष्टÑ मेडिकल कॉन्सीलने दिलेले वैद्यकीय सेवेचे रजिस्टेशन रद्द करावे, अ‍ॅट्रॉसिटी कायद्यानुसार डॉ.पायलच्या कुटुंबियांना आर्थिक मदत करावी तसेच अ‍ॅट्रॉसिटी अ‍ॅक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करून जलदगती न्यायालयात सदर खटला चालवावा, अशी मागणी केली आहे. निवेदन देतेवेळी भारिप बहुजन महासंघाचे जिल्हाध्यक्ष बाळू टेंभूर्णे, हंसराज बडोले, योगेंद्र बांगरे, माला भजगवडी, जी.के.बारसिंगे, डॉ.योगेंद्र नंदेश्वर, नरेंद्र बांबोळे, सपना रामटेके, सीमा दुर्गे, नामदेव मेश्राम, मनोज घायवान, सिद्धार्थ भैसारे, अनिल राऊत हजर होते.

Web Title: Arrest Payal's killers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :doctorडॉक्टर