दडी मारलेल्या पावसाचे आगमन, रोवणीच्या कामास सुरुवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2021 04:30 AM2021-07-25T04:30:42+5:302021-07-25T04:30:42+5:30
काही दिवस पावसाने दडी मारल्याने अनेक शेतकऱ्यांनी आपल्या शेताशेजारील तलाव, बोडी, नाले, ओढ्याचे पाणी आणून रोवणीच्या कामास सुरुवात केली. ...
काही दिवस पावसाने दडी मारल्याने अनेक शेतकऱ्यांनी आपल्या शेताशेजारील तलाव, बोडी, नाले, ओढ्याचे पाणी आणून रोवणीच्या कामास सुरुवात केली. आता दोन- तीन दिवसापासून तुरळक पाऊस येत असल्याने रोवणीचे काम सुरू आहे. तालुक्यात मोठ्या प्रमाणात शेती व्यवसाय केल्या जातो, तर काही प्रमाणात सोयाबीन, कापूस पिकाचे उत्पादन घेतल्या जाते. मात्र यावर्षी रोहणी, मृग नक्षत्रात पावसाचे काही प्रमाणात आगमन झाले त्यानुसार खरीप हंगामात शेती कामाला सुरुवात झाली होती. शेतकऱ्यांनी धानाचे पऱ्हे १०० टक्के टाकले. मृग संपल्यावर आर्द्रा नक्षत्रात मोठ्या प्रमाणात पाऊस येईल, ही अपेक्षा होती मात्र तेथेही पावसाने हुलकावणी दिली. शेतकरी विवंचनेत असताना तुरळक पावसाला सुरुवात झाली आणि काही क्षणातच पावसाच्या मध्यम स्वरूपाच्या सरी बरसल्या. पाऊस चामोर्शी तालुक्यांतील अनेक गावातील परिसरात सर्वदूर पसरला त्यामुळे शेतकऱ्यामध्ये शेती कामासाठी उत्साह वाढताना दिसून येत आहे.
240721\img-20210712-wa0086.jpg
शेताच्या बांधावर रोवनीचे प-हे खोदतांना मजुरवर्ग