अरसोडात कालव्याचे भूमिपूजन

By admin | Published: May 6, 2017 01:27 AM2017-05-06T01:27:25+5:302017-05-06T01:27:25+5:30

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत इटियाडोह प्रकल्पांतर्गत येणाऱ्या अरसोडा येथील मायनर

Arshodat Kallavi's Bhumi Pujan | अरसोडात कालव्याचे भूमिपूजन

अरसोडात कालव्याचे भूमिपूजन

Next

२२५ मजुरांना मिळाले काम : १४ लाख ६८ हजारांचा निधी उपलब्ध
शहर प्रतिनिधी ।
लोकमत न्यूज नेटवर्क
आरमोरी : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत इटियाडोह प्रकल्पांतर्गत येणाऱ्या अरसोडा येथील मायनर क्रमांक १ व २ च्या नूतनीकरण व मजबुतीकरण कामाचे भूमिपूजन जि. प. सदस्य मनीषा दोनाडकर यांंच्या हस्ते करण्यात आले.
कालव्याचे नूतनीकरण व मजबुतीकरण कामाकरिता १४ लाख ६८ हजार रूपयांचा निधी मंजूर झाला आहे. या कामावर २२५ मजुरांना रोजगार उपलब्ध झाला आहे. कालव्याच्या भूमिपूजन प्रसंगी पं. स. उपसभापती यशवंत सुरपाम, वैैनगंगा पाणी वापर संस्थेच्या अध्यक्ष संगीता भोयर, ग्रा. पं. सदस्य गोपाळ पगाडे, अशोक भोयर, अरसोडा येथील नागरिक व मजूर उपस्थित होते.
अरसोडा येथे मायनरच्या कामामुळे गावातील अनेक मजुरांना रोजगार उपलब्ध झाला आहे.

Web Title: Arshodat Kallavi's Bhumi Pujan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.