नारगुंडा पाेलीस मदत केंद्रातर्फे आशावर्कर व अंगणवाडी सेविकांचा सत्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2021 04:24 AM2021-06-19T04:24:42+5:302021-06-19T04:24:42+5:30
नारगुंडा हद्दीतील गावांमध्ये कार्यरत आशावर्कर, अंगणवाडी सेविकांना साडी-चोळी, नारळ देऊन गाैरविण्यात आले. कोरोना संकटातही आदिवासी लोकांमध्ये कोरोना आजाराबाबत जागरुकता ...
नारगुंडा हद्दीतील गावांमध्ये कार्यरत आशावर्कर, अंगणवाडी सेविकांना साडी-चोळी, नारळ देऊन गाैरविण्यात आले. कोरोना संकटातही आदिवासी लोकांमध्ये कोरोना आजाराबाबत जागरुकता निर्माण करणे तसेच लाेकांच्या मनात असलेली भीती दूर करून त्यांना लसीकरणासाठी प्रवृत्त करण्याकरिता आशा व अंगणवाडी सेविकांचा सत्कार साेहळा आयाेजित करण्यात आला हाेता. कार्यक्रमाला कोडपे, खंडी, नैनवाडी, हलवेर, नारगुंडा येथील आशावर्कर आणि अंगणवाडी सेविका हजर होत्या. दरम्यान, त्यांच्याकडून गावातील दिव्यांग व्यक्ती, विधवा, घटस्फोटित महिला यांची आकडेवारी घेऊन शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्याबाबत नारगुंडा पोलीस मदत केंद्राचे प्रभारी अधिकारी ज्ञानेश्वर लांड यांनी आश्वासन दिले. दुर्गम भागात सेवा देताना अडचणी आल्यास त्या समस्या मांडण्याचे आवाहन केले. यावेळी पाेलीस उपनिरीक्षक कुणाल चव्हाण व कर्मचारी उपस्थित हाेते.
===Photopath===
170621\0452218-img-20210617-wa0019.jpg
===Caption===
सत्कार करताना नारगुंडा पोमके अधिकारी व कर्मचारी