आश्वासित प्रगती योजनेच्या लाभापासून आश्रमशाळा कर्मचारी वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2021 04:34 AM2021-08-01T04:34:14+5:302021-08-01T04:34:14+5:30

आश्रमशाळा कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष प्रा. रमेशचंद्र दहीवडे यांच्या नेतृत्वात व नागरपूर येथील मनोहर मुळे यांच्या उपस्थितीत हे आंदाेलन झाले. ...

Ashram school staff deprived of benefits of assured progress scheme | आश्वासित प्रगती योजनेच्या लाभापासून आश्रमशाळा कर्मचारी वंचित

आश्वासित प्रगती योजनेच्या लाभापासून आश्रमशाळा कर्मचारी वंचित

Next

आश्रमशाळा कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष प्रा. रमेशचंद्र दहीवडे यांच्या नेतृत्वात व नागरपूर येथील मनोहर मुळे यांच्या उपस्थितीत हे आंदाेलन झाले. एक चतुर्थांश वेतनात कर्मचाऱ्यांना ठेका पद्धतीच्या नावाने राबवून घेतले जात आहे. देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने समान कामास समान वेतन असा निर्णय दिला असला तरी प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी होताना दिसून येत नाही. कर्मचाऱ्यांवर अन्याय केला जात आहे, असे प्रा. दहीवडे म्हणाले. त्यानंतर चित्रकुट कोवे यांच्या नेतृत्वात शिष्टमंडळ आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी आशिष येरेकर यांना भेटले व मागण्यांचे निवेदन सादर केले. याप्रसंगी प्रकल्प स्तरावरील सर्व प्रश्न लवकरच निकाली काढण्यात येईल, असे आश्वासन प्रकल्प अधिकारी आशिष येरेकर यांनी दिले. याप्रसंगी चित्रकुट कोवे, लालाजी मडावी, प्रकाश नरोटे, वंदना गेडेकर, गुरुदेव मडावी, वृंदा वड्डे, पी. जी. भुरसे, एम. के. साखरे, नारायण दिकोंडावार, चेतन कन्नाके, प्रशांत सिडाम, अमोल ताटलावार, डी. पी. शिंपी, प्रवीण मडावी उपस्थित होते.

बाॅक्स

या आहेत प्रमुख मागण्या

बदली करताना जे कर्मचारी दीर्घकाळापासून दुर्गम भागात आहेत. त्यांची बदली सुगम भागातील शाळेत करण्यात यावी, ज्या कर्मचाऱ्याची सेवा १० वर्ष, २० वर्ष, ३० वर्षे झाली त्या कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगानुसार आश्वासीत प्रगती योजनेचा लाभ देण्यात यावा. वयाच्या नावाखाली कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्त करण्यात येऊ नये, थकीत बदली टी.ए. बिल देण्यात यावे. कर्मचाऱ्यांना गणवेश देण्यात यावा, आदी मागण्यांचा निवेदनात समावेश होता.

Web Title: Ashram school staff deprived of benefits of assured progress scheme

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.