गडचिरोलीतील आश्रमशाळेत विद्यार्थ्यांसोबत डुकरांचाही वावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 25, 2017 12:35 PM2017-11-25T12:35:37+5:302017-11-25T12:37:11+5:30
राज्याच्या आदिवासी विकास विभागाच्या वतीने अहेरी येथील आदिवासी प्रकल्प कार्यालयामार्फत हालेवारा येथे शासकीय आश्रमशाळा चालविली जाते. मात्र या शाळेच्या खुल्या आवारात पाळीव जनावरे, डुकरांचा वावर राहत असल्याने विद्यार्थ्यांना त्रास होत आहे.
आॅनलाईन लोकमत
एटापल्ली : राज्याच्या आदिवासी विकास विभागाच्या वतीने अहेरी येथील आदिवासी प्रकल्प कार्यालयामार्फत हालेवारा येथे शासकीय आश्रमशाळा चालविली जाते. मात्र या शाळेच्या खुल्या आवारात पाळीव जनावरे, डुकरांचा वावर राहत असल्याने विद्यार्थ्यांना त्रास होत आहे. मात्र या प्रकाराकडे संबंधित आश्रमशाळेचे मुख्याध्यापक व शिक्षकांचे दुर्लक्ष होत आहे.
सदर आश्रमशाळेतील विद्यार्थी भोजनाचा ताट घेऊन याच खुल्या परिसरात भोजन करीत असतात. याच दरम्यान मोकाट डुकरे व पाळीव जनावरे सदर शाळेच्या परिसरात शिरतात. हा सारा प्रकार मुख्याध्यापक व शिक्षकांच्या समोर घडत आहे. मात्र यासंदर्भात आश्रमशाळा प्रशासनाने कोणतीही उपाययोजना केल्याचे दिसून येत नाही. विद्यार्थ्यांचा भोजन याच परिसरात हो असल्याने त्यांच्या आरोग्यास धोका होण्याची शक्यता नाकारता येत नाही. याकडे प्रकल्प अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन डुक्कर व पाळीव जनावरे बंदोबस्ताबाबत कार्यवाही करावी, अशी मागणी पालकांनी केली आहे.