लाचखोर एएसआय एसीबीच्या जाळ्यात; ५ हजारांची लाच घेताना रंगेहात अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2022 03:32 PM2022-03-09T15:32:36+5:302022-03-09T15:35:08+5:30

गुन्ह्यात आरोपी न करण्यासाठी मागितले ३० हजार

ASI arrested for accepting bribe of 5 thousand in gadchiroli | लाचखोर एएसआय एसीबीच्या जाळ्यात; ५ हजारांची लाच घेताना रंगेहात अटक

लाचखोर एएसआय एसीबीच्या जाळ्यात; ५ हजारांची लाच घेताना रंगेहात अटक

Next

अहेरी/आलापल्ली (गडचिरोली) : अपघाताच्या गुन्ह्यात आरोपी न करण्यासाठी एका व्यक्तीला ३० हजार रुपयांची मागणी करून, प्रत्यक्ष ५ हजार रुपयांची लाच घेताना एका सहायक पोलीस उपनिरीक्षकाला (एएसआय) रंगेहाथ पकडण्यात आले. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) पथकाने मंगळवारी आलापल्ली येथील पोलीस चौकीत करण्यात आली.

बाजीराव सोमजी सिडाम (५५ वर्षे) असे त्या एएसआयचे नाव आहे. ते अहेरी पोलीस ठाणे अंतर्गत आलापल्ली येथील पोलीस चौकीत कार्यरत आहेत. प्राप्त माहितीनुसार, तक्रारदार हे अहेरी तालुक्यातील मलमपल्ली येथे राहात असून शेतीचा व्यवसाय करतात. ७ फेब्रुवारी २०२२ रोजी त्यांच्या भावाच्या नावाने असलेल्या मोटारसायकलने मद्दीगुडम मार्गाने ते जात असताना समोरून येणाऱ्या दुचाकीला त्यांची धडक झाली. या अपघाताची अहेरी पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली. त्याबाबत आलापल्ली चौकीचे एएसआय सिडाम यांनी तक्रारदाराला पोलीस चौकीमध्ये बोलवून सदर गुन्ह्यात त्यांना आरोपी न करणे व मोटारसायकल परत देण्याकरिता ३० हजार रुपयांची मागणी केली. त्यामुळे त्यांनी गडचिरोली एसीबीकडे तक्रार केली. त्यानुसार ही कारवाई करण्यात आली.

ही कारवाई एसीबीचे पोलीस अधीक्षक राकेश ओला, अपर अधीक्षक मधुकर गिते यांच्या मार्गदर्शनात गडचिरोलीचे प्रभारी पोलीस उपअधीक्षक अविनाश भामरे, सहायक फौजदार प्रमोद ढोरे, हवालदार नथ्थु धोटे, नायक राजेश पदमगिरवार, श्रीनिवास संगोजी, शिपाई किशोर ठाकुर, चालक तुळशिराम नवघरे आदींनी केली.

अन् तडजोड करत स्वीकारले ५ हजार

प्राप्त तक्रारीप्रमाणे पोलीस उपअधीक्षक अविनाश भामरे यांनी गोपनीयरीत्या सापळा कारवाईचे आयोजन केले. त्यामध्ये एएसआय सिडाम यांनी पडताळणीदरम्यान तक्रारीत तथ्य आढळून आले. तडजोडीअंती ५ हजार रुपयांची लाच घेताना सिडाम यांना मंगळवार, दि. ८ रोजी आलापल्ली पोलीस चौकीत रंगेहाथ पकडण्यात आले. त्यांच्याविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा नोंद करण्यात आला.

Web Title: ASI arrested for accepting bribe of 5 thousand in gadchiroli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.