इल्लूर ते चपराळा देवस्थान नाक्यापर्यंत डांबरीकरण करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2021 04:34 AM2021-02-14T04:34:35+5:302021-02-14T04:34:35+5:30
मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून ह्या रस्त्याचे डांबरीकरण करण्यात येत आहे. यासाठी ३ कोटी ५० लाख रुपयांचा निधी मंजूर झाला ...
मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून ह्या रस्त्याचे डांबरीकरण करण्यात येत आहे. यासाठी ३ कोटी ५० लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. गेल्या दीड महिन्यापासून रस्त्याचे काम सुरू आहे. रस्त्यावर गिट्टी, माती टाकून रोलर फिरविला जात आहे. ११ मार्चला महाशिवरात्रीनिमित्त चपराळा येथे यात्रा भरणार आहे. विदर्भातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या चपराळा देवस्थानात भगवान हनुमानाचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी उसळते. अनेक भाविक कार्तिकस्वामी महाराजांच्या समाधीचे दर्शन घेतात. या मार्गाने ठाकरी, कुनघाडा (माल), रामनगट्टा, इल्लूर येथील नागरिक दररोज ये-जा करतात. रस्त्याच्या कामांमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. भाविकांना चपराळा येथे जाण्यास अडचण येऊ नये म्हणून रस्त्याचे काम महाशिवरात्रीच्या पूर्वी पूर्ण करावे, अशी मागणी हनुमान मंदिर देवस्थान कमिटीने केली आहे.