मालमत्ता सर्वेक्षण पद्धत चुकीची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2018 12:41 AM2018-02-22T00:41:34+5:302018-02-22T00:41:48+5:30

गडचिरोली नगर पालिका क्षेत्रात मालमत्तेचे जीआयएस प्रणालीद्वारे सर्वेक्षण केले जात आहे. येथे सर्वे करणारे बाहेरचे लोक आहेत.

The asset survey method is incorrect | मालमत्ता सर्वेक्षण पद्धत चुकीची

मालमत्ता सर्वेक्षण पद्धत चुकीची

googlenewsNext
ठळक मुद्देबाहेरून सर्वे करावा : माजी नगराध्यक्षांचा पालिकेच्या कारभारावर आक्षेप

ऑनलाईन लोकमत
गडचिरोली : गडचिरोली नगर पालिका क्षेत्रात मालमत्तेचे जीआयएस प्रणालीद्वारे सर्वेक्षण केले जात आहे. येथे सर्वे करणारे बाहेरचे लोक आहेत. सर्वेअर घराच्या प्रत्येक खोलीत जाऊन मोजमाप करीत आहेत. तसेच शौचालय, बाथरूम व इतर सर्व बांधकामाची पाहणी करून प्रत्यक्षात मोजणी करीत आहेत. सदर सर्वे हा आतून होत असल्यान ही पध्दत चुकीची आहे. यात नागरिकांच्या हिताचा व सुरक्षेचा कुठलाही विचार करण्यात आला नाही, असा आक्षेप गडचिरोलीच्या माजी नगराध्यक्ष डॉ. अश्विनी यादव यांनी केला आहे.
या संदर्भात त्यांनी म्हटले आहे की, नगर पालिका प्रशासनाला शहरवासीयांवर घरटॅक्स लावायचा आहे तर घराचे बाहेरून मोजमाप करावे. अनोळखी व्यक्ती सर्वेअर म्हणून येत असल्याने चोरी व इतर प्रकार घडल्यास जबाबदार कोण? असा सवालही डॉ. यादव यांनी नगर पालिका प्रशासनाला केला आहे. नगराध्यक्ष व नगरसेवकांनी नागरिकांच्या हिताचा व सुरक्षेचा विचार करून सर्वेक्षण करण्यासाठी परवानगी द्यावी, असेही त्यांनी म्हटले आहे. अनोळखी व्यक्ती सर्वे करण्यास घरी आल्यास त्याला बाहेरून सर्वे करण्यास सांगावे. घरात कुठलाही प्रवेश करू देऊ नये. आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तीला याबाबत कल्पना द्यावी, असे आवाहन डॉ. यादव यांनी शहरवासीयांना केले आहे.

शहरातील मालमत्तेचे जीआयएसद्वारे सर्वेक्षण करण्याचा शासनाचा प्रोजेक्ट आहे. या प्रोजेक्टमुळे घरमालकांवर तंतोतंत टॅक्सची आकारणी होईल. नगर विकास विभागाने सर्वेसाठी एजन्सी नेमली आहे. हीच पध्दत संपूर्ण महाराष्ट्रात लागू आहे. पूर्वी सर्वेक्षणादरम्यान अर्धी जागा सुटायची त्यामुळे घरमालकांवर तंतोतंत टॅक्स लागू होत नव्हता. याबाबत कोणाच्या काही भावना वा आक्षेप असल्यास त्यांनी शासनाकडे कळवाव्यात.
- कृष्णा निपाने, मुख्याधिकारी, न.प. गडचिरोली

Web Title: The asset survey method is incorrect

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.