चार हजारांची लाच घेणारा सहायक लेखाधिकारी जाळ्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2018 07:09 PM2018-06-21T19:09:17+5:302018-06-21T19:09:17+5:30
एका निवृत्त महिला कर्मचाºयाची पेंशन केस मंजूर करण्यासाठी ४ हजार रुपयांची लाच स्वीकारताना गडचिरोली जिल्हा
गडचिरोली : एका निवृत्त महिला कर्मचाºयाची पेंशन केस मंजूर करण्यासाठी ४ हजार रुपयांची लाच स्वीकारताना गडचिरोली जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागातील सहायक लेखाधिकारी रवींद्र देवतळे याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) अधिकाºयांनी अटक केली. ही कारवाई गुरूवारी (दि.२१) दुपारी करण्यात आली.
एसीबीकडून प्राप्त माहितीनुसार, तक्रारकर्ती महिला ही जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागात कार्यरत होती. प्रकृती बरी राहात नसल्यामुळे तिने स्वेच्छानिवृत्ती घेतली. त्यामुळे पेन्शन केस सादर करण्यात आली. ती वरिष्ठांकडे सादर करून मंजूर करून घेण्यासाठी सहायक लेखाधिकारी देवतळे याने ५ हजार रुपयांची मागणी केली. परंतू तडजोडीअंती ४ हजारात काम करण्याचे देवतळे याने कबूल केले.
दरम्यान तक्रारकर्त्या महिलेच्या गुजरात राज्यात मजुरीचे काम करणाºया मुलाने या प्रकाराची तक्रार एसीबीकडे केली. या विभागाच्या अधिकाºयांनी गुरूवारी (दि.२१) जिल्हा परिषद कार्यालयासमोरील हॉटेलमध्ये सापळा रचला. तिथे तक्रारकर्त्या महिलेच्या मुलाकडून लाचेची रक्कम स्वीकारताना देवतळे याला रंगेहात पकडण्यात आले. त्याच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक कायद्याच्या कलम ७, १३ (१) (ड), सहकलम ३२ (२) अन्वये गुन्हा दाखल करून अटक केली.
ही कारवाई एसीबीचे पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील, उपअधीक्षक डी.एम.घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रवी राजुलवार, एम.एस.टेकाम, सहायक फौजदार मोरेश्वर लाकडे, सत्यम लोहंबरे, रवींद्र कत्रोजवार, सुधाकर दंडिकवार, महेश कुकुडकार, गणेश वासेकर, सोनल आत्राम, सोनी तावाडे, तुळशीदास नवघरे, घनश्याम वडेट्टीवार यांनी यशस्वी केली.