नर्सेसना पदाेन्नतीचे आश्वासन; उपाेषण मागे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2021 04:25 AM2021-07-16T04:25:47+5:302021-07-16T04:25:47+5:30

प्रलंबित विविध मागण्यांसाठी नर्सेस उपाेषणाला बसल्या हाेत्या. त्यांच्या उपाेषणाची दखल जिल्हा परिषदेने घेतली. उपाेषण मंडपाला जिल्हा परिषद अध्यक्ष अजय ...

Assurance of promotion to nurses; Behind the worship | नर्सेसना पदाेन्नतीचे आश्वासन; उपाेषण मागे

नर्सेसना पदाेन्नतीचे आश्वासन; उपाेषण मागे

googlenewsNext

प्रलंबित विविध मागण्यांसाठी नर्सेस उपाेषणाला बसल्या हाेत्या. त्यांच्या उपाेषणाची दखल जिल्हा परिषदेने घेतली. उपाेषण मंडपाला जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार, जि. प. उपाध्यक्ष मनोहर पोरेटी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शशिकांत शंभरकर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुनील मडावी, माता व बालसंगोपन अधिकारी डॉ. समीर

बनसोडे, अतिरिक्त जिल्हा आराेग्य अधिकारी डॉ. हेमके यांनी भेट दिली. यावेळी नर्सेस भगिनींच्या सेवाविषयक प्रश्नांवर सकारात्मक चर्चा करून सात दिवसांच्या आत प्रश्न निकाली काढण्यात येईल, असे आश्वासन देण्यात आले. त्यानुसार नर्सेस एलएचव्हीमधून आरोग्य पर्यवेक्षिका व एएनएममधून आरोग्य सहाय्यिका यांची फाईल आरोग्य विभागातून मागून विभागीय पदोन्नती समितीने तत्काळ फाईल मंजूर केली. त्यामुळे नर्सेस संवर्गाच्या पदोन्नतीचा मार्ग मोकळा झाला आहे. याबद्दल नर्सेस संघटनेने जि. प. अध्यक्ष अजय कंकडालवार, उपाध्यक्ष मनोहर पोरेटी व सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांचे आभार मानले आहेत, असे नर्सेस संघटनेच्या अध्यक्ष माया सिरसाट, प्रभारी अध्यक्ष नीलू वानखेडे, तालुकाध्यक्ष वंदना भारती, सचिव ज्योती कांबरे, कार्याध्यक्ष बेबी बढे, उपाध्यक्ष मंगला चंदनखेडे, आशा कोकोडे, विद्या आडेपवार यांनी म्हटले आहे.

Web Title: Assurance of promotion to nurses; Behind the worship

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.