नेहरू प्राथमिक शाळेत आकाशदर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2020 04:45 AM2020-12-30T04:45:28+5:302020-12-30T04:45:28+5:30
क्रेन्स संस्थेच्या किलबिल नेचर क्लबच्या वतीने स्थानिक पं. जवाहरलाल नेहरू प्राथमिक शाळेत आयोजित आकाश दर्शन या अनोख्या कार्यक्रमाचे उद्घाटन ...
क्रेन्स संस्थेच्या किलबिल नेचर क्लबच्या वतीने स्थानिक पं. जवाहरलाल नेहरू प्राथमिक शाळेत आयोजित आकाश दर्शन या अनोख्या कार्यक्रमाचे उद्घाटन दंडकारण्य शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. राजाभाऊ मुनघाटे यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक म्हणून खगोल, जीवाश्म आणि निसर्ग अभ्यासक तथा ग्रीन प्लॅनेट संस्थेचे अध्यक्ष प्रा. सुरेश चोपणे उपस्थित होते. तसेच गडचिरोली वनविभागाचे मानद वन्यजीव रक्षक मिलिंद उमरे , क्रेन्स संस्थेच्या सचिव तथा योगशिक्षिका अंजली कुळमेथे, वसंत विद्यालयाचे मुख्याध्यापक शेमदेव चाफले, पं. जवाहरलाल नेहरू प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक सुधीर गोहणे, मानसशास्त्रज्ञ शशिकांत शंकरपुरे, वनपरिक्षेत्र अधिकारी कैलुके, प्राचार्य डॉ. संजय भांडारकर, वसंत विद्यालयाच्या शिक्षिका बिसेन आदी उपस्थिती होती. या कार्यक्रमात प्रा. सुरेश चोपणे यांनी आधी पॉवर पॉइंट प्रेझेंटेशनद्वारे आकाशातील ग्रह, तारे, नक्षत्रांची ओळख, त्यांची वैशिष्ट्ये, महत्त्व, आकाश दर्शन कसे करावे, खगोलशास्त्र, अंतराळ अभ्यास, या क्षेत्रातील संधी आदींची माहिती सविस्तर माहिती दिली.या उपक्रमासाठी शरद डोके, खुशाल ठाकरे, अतीश उरकुडे तसेच शाळेच्या कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.
फोटो कॅप्शन : आकाशातील ग्रह, नक्षत्रांची माहिती देताना प्रा. सुरेश चोपणे व उपस्थित इतर.