एटापल्ली, घोटला वादळाचा तडाखा
By admin | Published: May 25, 2016 01:41 AM2016-05-25T01:41:08+5:302016-05-25T01:41:08+5:30
सोमवारी सायंकाळच्या सुमारास आलेल्या वादळाचा तडाखा एटापल्ली शहरासह तालुक्याला बसला.
एटापल्ली/घोट : सोमवारी सायंकाळच्या सुमारास आलेल्या वादळाचा तडाखा एटापल्ली शहरासह तालुक्याला बसला. या वादळामुळे अनेक घरांवरील टिन शेड उडाले. तसेच मंगळवारी सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास घोट परिसराला वादळाचा तडाखा बसला. वादळामुळे रस्त्यालगतचे अनेक वृक्ष विजतारांवर कोसळले. त्यामुळे वीज पुरवठा खंडीत झाला. मंगळवारी घोट येथील आठवडी बाजार होता. दरम्यान सायंकाळच्या सुमारास आलेल्या वादळामुळे येथील विक्रेते व ग्राहकांना त्रास झाला. रात्री उशीरापर्यंत घोट येथील वीज पुरवठा सुरळीत झाला नव्हता. (लोकमत न्यूज नेटवर्क)
वास्तू पूजनापूर्वीच वादळाने केला घात : एटापल्लीपासून दोन किमी अंतरावर असलेल्या जीवनगट्टा येथील रहिवासी रामदास बंडू कुमोटी यांनी काही दिवसांपूर्वीच टिनपत्र्याच्या छताचे नवे घर बांधले. सोमवारी झालेल्या वादळामुळे या घरावरील टिन शेड उडाले. वास्तू पूजन करून घरी जाण्यापूर्वीच वादळाने कुमोटी यांचा घात केला.