वनहक्क पट्टे मिळवून देण्यास प्रयत्नशील
By Admin | Published: October 15, 2015 01:36 AM2015-10-15T01:36:49+5:302015-10-15T01:36:49+5:30
२५ ते ३० वर्षांचा कालावधी उलटूनही तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांना जमिनीचे वनहक्क पट्टे प्राप्त झाले नाहीत.
जाणल्या शेतकऱ्यांच्या समस्या : सिरोंचा येथे खासदारांनी दिले आश्वासन
सिरोंचा : २५ ते ३० वर्षांचा कालावधी उलटूनही तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांना जमिनीचे वनहक्क पट्टे प्राप्त झाले नाहीत. प्रशासनातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे अनेक शेतकऱ्यांना वनहक्क पट्ट्यांपासून वंचित राहावे लागले. ही बाब अत्यंत खेदजनक असून पट्ट्यांपासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना वनहक्क पट्टे मिळवून देण्यास आपण प्रयत्नशील आहोत, असे आश्वासन खा. अशोक नेते यांनी सिरोंचा येथे दिले.
सिरोंचा भागातील शेतकऱ्यांच्या मंगळवारी खासदारांनी भेटी घेतल्या. यावेळी भाजप जिल्हा संघटनमंत्री बाबुराव कोहळे, जिल्हा उपाध्यक्ष रवींद्र ओल्लालवार, जिल्हासचिव भारत खटी, जिल्हामहामंत्री दामोधर अरीगेला, तालुका अध्यक्ष संदीप राचेर्लावार, तालुका महामंत्री कलाम हुसैन, जयंत मांडवे, सुनीता मोहुर्ले, जयश्री गणगोटा, रवी चकीनारप, कल्पना शेंडे उपस्थित होत्या. सिरोंचातील रस्ते, पाणी, वीज व विविध समस्या सोडविण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचेही खा. अशोक नेते यांनी सांगितले.