केंद्र सरकारकडून ओबीसी आरक्षण विभाजनाचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2021 08:54 AM2021-02-05T08:54:35+5:302021-02-05T08:54:35+5:30
महाराष्ट्रातील जनतेच्या ज्वलंत प्रश्नांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी बीआरएसपीच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रात ५० दिवसीय जनसंघर्ष यात्रेचे आयाेजन करण्यात आले आहे. ...
महाराष्ट्रातील जनतेच्या ज्वलंत प्रश्नांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी बीआरएसपीच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रात ५० दिवसीय जनसंघर्ष यात्रेचे आयाेजन करण्यात आले आहे. ही यात्रा प्रजासत्ताकदिनी मंगळवारला सायंकाळी गडचिराेली येथे पाेहाेचली. त्यानिमित्त डाॅ.माने यांनी पत्रकारांशी संवाद साधला. याप्रसंगी बीआरएसपीचे विदर्भ प्रदेश सचिव डाॅ.कैलास नगराळे उपस्थित हाेते.
भाजपप्रणीत केंद्र सरकारकडून ओबीसी आरक्षणाचे तुकडे पाडण्याचा प्रयत्न सुरू आहे. मात्र भाजप व काॅंग्रेसमधील ओबीसी प्रवर्गातील एकही नेता याबाबत पूर्णत: गप्प आहे. या मुद्यावर ओबीसी समाजाचे नेते गप्प का, असा सवालही डाॅ.माने यांनी यावेळी उपस्थित केला. बीआरएसपीच्या वतीने काढण्यात आलेली जनसंघर्ष यात्रा ही काेणत्या पक्षाच्या विराेधात नसून अन्यायाच्या विराेधात आहे. सर्वसामान्य, शेतकरी, शेतमजूर, बेराेजगार व मागास वर्गाच्या समस्या शासन दरबारी पाेहाेचविण्याचा यात्रेचा उद्देश आहे. शेतकरी, शेती व शेतमजूर यांच्याशी संबंधित ५० टक्के खटले न्यायालयात प्रलंबित आहेत. हे खटले लवकर निकाली काढण्यासाठी देशात किसान काेर्ट निर्माण करण्यात यावे, अशी मागणी करणारा बीआरएसपी हा पहिला पक्ष आहे, असे माने यावेळी म्हणाले.