आॅटो चालकाच्या मुलाचीही परीक्षेत भरारी

By admin | Published: June 2, 2016 02:54 AM2016-06-02T02:54:27+5:302016-06-02T02:54:27+5:30

गडचिरोली येथील जिल्हा परिषद हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालयाचा विद्यार्थी शुभम वसंत बाकमवार

The auto driver's boy was also in the examination | आॅटो चालकाच्या मुलाचीही परीक्षेत भरारी

आॅटो चालकाच्या मुलाचीही परीक्षेत भरारी

Next

गडचिरोली येथील जिल्हा परिषद हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालयाचा विद्यार्थी शुभम वसंत बाकमवार रा. कुनघाडा (माल) याने एमएचटी-सीईटी परीक्षेत १८१ गुण घेऊन यश मिळविले आहे. शुभमचे वडील वसंत बाकमवार हे आॅटोचालक असून आष्टी-कुनघाडा मार्गावर प्रवाशांची वाहतूक करतात. अत्यंत गरीबीच्या परिस्थितीत शुभम बाकमवार याने हे यश मिळविले आहे. एमएचटी-सीईटी परीक्षेत शुभमने जिल्ह्यात दुसरा क्रमांक पटकाविला आहे.

Web Title: The auto driver's boy was also in the examination

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.