गव्हाचे ४१० क्विंटल बियाणे उपलब्ध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 3, 2017 12:25 AM2017-12-03T00:25:45+5:302017-12-03T00:26:25+5:30

जिल्हा परिषदेच्या मार्फत शेतकऱ्यांना ५० टक्के अनुदानावर बियाण्यांचे वितरण केले जाते. यावर्षीच्या रबी हंगामासाठी सुमारे ४१० क्विंटल बियाणे उपलब्ध करून देण्यात आले आहे.

Available 410 quintals of wheat seed | गव्हाचे ४१० क्विंटल बियाणे उपलब्ध

गव्हाचे ४१० क्विंटल बियाणे उपलब्ध

Next
ठळक मुद्दे५० टक्के अनुदान : ६३० रूपये प्रतिबॅग

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : जिल्हा परिषदेच्या मार्फत शेतकऱ्यांना ५० टक्के अनुदानावर बियाण्यांचे वितरण केले जाते. यावर्षीच्या रबी हंगामासाठी सुमारे ४१० क्विंटल बियाणे उपलब्ध करून देण्यात आले आहे.
गडचिरोली जिल्ह्यात ज्या शेतकऱ्यांकडे सिंचनाची सुविधा आहे. असे शेतकरी रबी पिकांची लागवड करतात. गडचिरोली जिल्ह्यातील हवामान व जमीन गहू पिकासाठी पोषक असल्याने गव्हाचे चांगले उत्पादन होऊ शकते. कमी पाण्यात व कमी खर्चात चांगले उत्पादन घेता येते. त्यासाठी शेतकºयांना जिल्हा परिषदेने १३ वने ७ टक्के वनमहसूल अनुदानातून गहू पिकाचे बियाणे उपलब्ध करून देण्यात आले आहेत. गडचिरोली तालुक्याला ७० क्विंटल, आरमोरी ५० क्विंटल, देसाईगंज ८० क्विंटल, कुरखेडा ६०क्विंटल, कोरची ५ क्विंटल, धानोरा ५ क्विंटल, चामोर्शी १२० क्विंटल, मुलचेरा ५ क्विंटल, अहेरी १० क्विंटल, सिरोंचा ५ क्विंटल असे एकूण ४१० क्विंटल बियाणे उपलब्ध करून देण्यात आले आहेत. या बियाण्यांचे ५० टक्के अनुदानावर वितरण केले जाणार आहे. ४० किलोची प्रती बॅग असून ६३० रूपये शेतकºयाला मोजावे लागणार आहेत. या योजनेच्या अधिक माहितीसाठी संबंधित पंचायत समितीचे कृषी विकास अधिकारी व विस्तार अधिकारी यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन जि.प. कृषी विभागाने केले आहे.

Web Title: Available 410 quintals of wheat seed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.