जिल्ह्यात सरासरी ७१.४४% मतदान

By admin | Published: February 17, 2017 01:16 AM2017-02-17T01:16:03+5:302017-02-17T01:16:03+5:30

नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्याच्या आठ तालुक्यांत ३५ जिल्हा परिषद क्षेत्र व ७० पंचायत समिती गणात गुरूवारी मतदान शांततेत पार पडले.

The average voter turnout in the district is 71.44% | जिल्ह्यात सरासरी ७१.४४% मतदान

जिल्ह्यात सरासरी ७१.४४% मतदान

Next

आठ तालुक्यांत ७१० मतदान केंद्र : पोर्लात तणावाची परिस्थिती उद्भवली; इतरत्र शांततेत मतदान
गडचिरोली : नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्याच्या आठ तालुक्यांत ३५ जिल्हा परिषद क्षेत्र व ७० पंचायत समिती गणात गुरूवारी मतदान शांततेत पार पडले. सरासरी ७१.४४ टक्के मतदान झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे. गुरूवारी सकाळी ७.३० वाजतापासून मतदानाला प्रारंभ झाला. सकाळी ९.३० वाजेपर्यंत जिल्ह्यात १२.२३ टक्के मतदान झाले होते. त्यानंतर हळूहळू मतदानाचा वेग वाढला. ११.३० वाजेपर्यंत ३२.८७ टक्के मतदान झाले. तर दुपारी १.३० वाजेपर्यंत ५७.६६ टक्के मतदान झाल्याची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाने दिली आहे.
सकाळपासूनच मतदानाला अनेक भागात उत्साह दिसून आला. दुर्गम व अतिदुर्गम भागातही मतदान केंद्रावर नागरिकांच्या रांगा लागून होत्या. कोरची तालुक्यात टेमली, दोलंदा, कोचीनारा आदी भागातही मतदारांनी मोठ्या प्रमाणावर मतदान केले. देसाईगंज तालुक्यात सकाळी ९.३० वाजेपर्यंत १४.७१ टक्के मतदान झाले. तर कुरखेडा तालुक्याच्या पुराडा व हेटीनगर भागात २५ टक्के मतदान झाले आहे. मुलचेरा तालुक्यात तिन्ही जिल्हा परिषद क्षेत्र मिळून दुपारी ३ वाजेपर्यंत ७९.२० टक्के मतदान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. कोरची, धानोरा, कुरखेडा आदी संवेदनशील तालुक्यात मोठा पोलीस बंदोबस्त मतदान केंद्रांवर लावण्यात आला होता. गडचिरोली तालुक्याच्या वसा-पोर्ला जिल्हा परिषद क्षेत्रात समाविष्ठ असलेल्या पोर्ला गावात कमालीचा तणाव दिसून आला. येथे पैसे वाटप करताना काही कार्यकर्त्यांना पोलिसांनी दुपारी २ वाजतानंतर पकडले. त्यांना पोलिसांच्या वाहनातच बसवून ठेवण्यात आले. याबाबीला गडचिरोलीचे ठाणेदार विजय पुराणिक यांनी लोकमतशी बोलताना दुजोरा दिला. कार्यकर्ते कोणत्या पक्षाचे होते. याची चौकशी करण्यात येत आहे, असे त्यांनी सांगितले. येथे भाजप व अपक्ष उमेदवारांच्या कार्यकर्त्यांमध्ये अनेकवेळा शाब्दिक चकमकही उडाली.
गडचिरोली तालुक्याच्या येवली-मुडझा मतदार संघात समाविष्ट असलेल्या पोटेगाव येथील दोन मतदान केंद्रावर अनुक्रमे ८१.७०, ७६.०७, राजोली येथे ७९.६२, देवापूर येथे ७६, मारदा येथे ८२.५०, जमगाव येथे ७२.०९ टक्के मतदान झाले.
तर धानोरा तालुक्याच्या मुरूमगाव येथे बुथ क्र. १ वर ८०.८६ व क्रमांक २ च्या बुथवर ७८ टक्के असे दोन्ही बुथ मिळून ७९.४३ टक्के मतदान झाले आहे. पन्नेमारा क्रमांक १ च्या केंद्रावर ६३.५३ व क्रमांक २ च्या केंद्रावर ५९, बेलगाव ८२.३४ तर हिरंगे केंद्रावर ६९.५५ टक्के मतदान झाले आहे. देवसूर ६४.९६, हेटी ८३.१७, कटेझरी ७०.९५, सोडे ७५.५८, मिचगाव ८५.९१, सालेभट्टी क्रमांक १ मध्ये ७८.२०, सालेभट्टी क्रमांक २ मध्ये ७४ टक्के, चातगाव क्रमांक १ मध्ये ८०.१६, चातगाव क्रमांक २ मध्ये ७७.९५, दुधमाळा क्रमांक १ मध्ये ८७.१५, दुधमाळा क्रमांक २ मध्ये ८५.२७, गिरोली ८३.३१, खुटगाव ८३.२३, मेंढाटोला ७८.१८, येरकड क्रमांक १ - ७३.९६, येरकड क्रमांक २- ७३.१७, लेखा क्रमांक १- ८७.७५, लेखा क्रमांक २ - ८३.६३, जांभळी क्रमांक १ - ८८.६६, जांभळी क्रमांक २- ८२.१५, चव्हेला ८२.३४, मुंगनेर ६५, चिचोली ८०.४९, नवरगाव क्रमांक १-८६.८५, नवरगाव क्रमांक २- ८६.१९, तुकूम ७७.४१ टक्के मतदान झाले आहे.
चामोर्शी तालुक्याच्या आमगाव मतदान केंद्रावर अनुक्रमे ७३, ६१ व ७०.५० टक्के मतदान झाले. हळदवाही येथे ५९.१६, माडेमुधोली येथे ६७.०५, चापलवाडा येथे ६७.३८, चापलवाडा चक येथे ६३.८२, मंजेगाव येथे ६६.०६, रेगडी १ येथे ७४.५१, रेगडी २ येथे ७२.५८, विकासपल्ली येथे ७८.७४, माडेआमगाव येथे ६२.९२, मक्केपल्ली येथे ७१.४६, मक्केपल्ली येथे ७४.८०, मक्केपल्ली येथे ७४.७९ टक्के मतदान झाले. शिमुलतला येथे ८६.१९, पलसपूर ६८.७८, शामनगर ७४.४१, पोतेपल्ली पॅच ८५.३७, सुभाषग्राम ७५.३०, सुभाषग्राम ६८.०८, गुंडली ५९.४५, ठाकुरूपा ७५.६०, ठाकरूपा ६७.२३, आनंदपूर ७०.८७, वसंतपूर ८६.८७, वसंतपूर ८२.२५ टक्के, घोट ५७.७९, कर्दुळ ८३.३७, घोट ५६.७१, घोट ६०.४५, घोट ७२.३८, निकतवाडा ७५.३७, निकतवाडा ८१.५६, वरूर ७६.८८, बेलगट्टा ८७ टक्के, पेटतळा ६७.४० टक्के मतदान ३ वाजेपर्यंत झाल्याची माहिती महसूल प्रशासनाच्या मंडळ अधिकाऱ्यांनी दिली. देसाईगंज तालुक्याच्या तुळशी येथे ७९.२३ टक्के मतदान झाले. येथे ८१३ पुरूष व ७४४ महिला असे एकूण १ हजार ७५५ मतदारांनी मतदानाचा हक्क बजाविला. दुपारी ३ वाजता मतदान बंद झाल्यानंतर काही भागात मतदारांच्या रांगा मतदान केंद्रावर होत्या. त्यातील शेवटच्या मतदाराला चिठ्ठी देऊन मतदान करवून घेण्यात आले. सायंकाळी उशीरापर्यंत तहसील कार्यालयात ईव्हीएम जमा करण्याचे काम सुरू होते. प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी दुरध्वनीवरून अंतिम आकडेवारी घेतली. (लोकमत न्यूज नेटवर्क)

Web Title: The average voter turnout in the district is 71.44%

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.