धान खरेदीची कामे करण्यास आविका संस्था संघटनेचा नकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2021 04:40 AM2021-09-22T04:40:38+5:302021-09-22T04:40:38+5:30

जिल्हा आविका पदाधिकारी व कर्मचारी संघटनेची सभा मंगळवारी कुरखेडा येथे पार पडली. सभेच्या अध्यक्षस्थानी संघटनेचे जिल्हाध्यक्ष चांगदेव फाये ...

Avika refuses to procure paddy | धान खरेदीची कामे करण्यास आविका संस्था संघटनेचा नकार

धान खरेदीची कामे करण्यास आविका संस्था संघटनेचा नकार

Next

जिल्हा आविका पदाधिकारी व कर्मचारी संघटनेची सभा मंगळवारी कुरखेडा येथे पार पडली. सभेच्या अध्यक्षस्थानी संघटनेचे जिल्हाध्यक्ष चांगदेव फाये होते. यावेळी कुरखेडा खरेदी-विक्री संस्थेचे सभापती व्यंकटी नागीलवार, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक विनोद खुणे, कुरखेडा आविका अध्यक्ष बाबूराव तुलावी, पलसगडचे राजाराम तुलावी, घाटीचे मुखरू टेकाम, खेडेगावचे शिवचरण मडावी, वासुदेव दुगा, गोमाजी करंगामी, देलनवाडीचे अध्यक्ष यशोधन मडावी, तुकाराम ढवळे, भाष्कर कोसरे, नान्हीचे अध्यक्ष भैरवी कुंवर, देऊळगावचे अध्यक्ष अशोक मडावी, कढोलीचे अध्यक्ष चौके, उराडीचे अध्यक्ष करंगामी, गेवर्धाचे पिल्लारे कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष हेमंत शेंदरे, सचिव महेंद्र मेश्राम, दिलीप कुमरे, प्रेम हुर्रे, तसेच कुरखेडा, कोरची आरमोरी, धानोरा येथील आविका पदाधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

सभेत महामंडळ प्रशासनाकडून आविका संस्थाचे थकीत कमिशन, मंडी चार्ज, शेतकऱ्यांच्या बारदाण्याचे थकीत पैसे. खरेदी करण्यात आलेल्या धानाची विहित मुदतीत उचल करण्यात येत नसल्याने होणाऱ्या नुकसानीला संस्थेला जबाबदार न धरता ही जबाबदारी महामंडळाकडे निश्चित करावी, आदी मागण्या मान्य झाल्याशिवाय या हंगामाची ऑनलाइनची कामे न करण्याचा निर्णय एकमताने घेण्यात आला. संचालन महेंद्र मेश्राम, तर आभार गेवर्धाचे व्यवस्थापक मस्के यांनी मानले.

210921\img-20210921-wa0108.jpg

आविका पदाधिकारी कर्मचारी संघटनेचा सभेत पदाधिकारी चर्चा करताना

Web Title: Avika refuses to procure paddy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.