आविका संस्थेचे प्रश्न विधानसभेत मांडणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2021 04:45 AM2021-07-07T04:45:23+5:302021-07-07T04:45:23+5:30
कुरखेडा : रब्बी धान खरेदी, बारदाणा, चुकारे, शेतकरी मंडी चाॅर्ज यासह इतर काेणतेही शेतकरी व आविका संस्थेचे प्रश्न ...
कुरखेडा : रब्बी धान खरेदी, बारदाणा, चुकारे, शेतकरी मंडी चाॅर्ज यासह इतर काेणतेही शेतकरी व आविका संस्थेचे प्रश्न असतील तर त्यांनी मला बिनधास्त सांगावे, हे सर्व प्रश्न आपण विधानसभेच्या अधिवेशनात मांडणार, अशी ग्वाही आ. कृष्णा गजबे यांनी दिली.
आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्था व पदाधिकारी-कर्मचारी संघटनेच्या वतीने कुरखेडा येथे कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी सत्काराला उत्तर देताना ते बाेलत हाेते. याप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा मध्यवर्ती बँकचे संचालक खेमनाथ डोंगरवार हाेते. प्रमुख अतिथी म्हणून आविका पदाधिकारी कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष चांगदेव फाये, गोठणगावचे सभापती यशवंत चौरीकर, कढोली आविकाचे अध्यक्ष फाल्गुन चौके, आंधळीचे उपसभापती विनोद खुणे, कुरखेडाचे अध्यक्ष बाबुराव तुलावी, देऊळगाव आविका अध्यक्ष अशोक मडावी, आविका घाटीचे अध्यक्ष टेकाम, गेवर्धाचे आविका उपाध्यक्ष पिल्लारे, देऊळगावचे उपसभापती शेख, पलसगडचे तुलावी, कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष हेमंत शेंदरे आदी उपस्थित होते.
यावेळी आमदार कृष्णा गजबे यांचा शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विनोद खुणे, संचालन मानिक दरवडे तर आभार महेंद्र मेश्राम यांनी केले. यशस्वीतेसाठी हेमंत शेंदरे, महेंद्र मेश्राम, लीलाधर घोसेकर, जी.एस. मदनकर, नरेंद्र पटने, घनश्याम ठलाल, राकेश मट्टे, बी.डी. बोरसरे, आर.बी. मस्के, कपिल तुलावी, सूरज बोरसरे, मानिक दरवडे आदींनी सहकार्य केले.
040721\1446img-20210704-wa0060.jpg
आ गजबे यांचा सत्कार करताना आविका पदाधिकारी