खत व्यवस्थापनाचा अवलंब करून अतिरिक्त खर्च टाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2021 04:36 AM2021-03-20T04:36:17+5:302021-03-20T04:36:17+5:30

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच प्रशाला अविनाश गेडाम हाेत्या. प्रमुख अतिथी म्हणून मडावी ग्रा.पं. सदस्य प्रीती मडावी, अविनाश गेडाम, रूपेश ...

Avoid additional costs by adopting fertilizer management | खत व्यवस्थापनाचा अवलंब करून अतिरिक्त खर्च टाळा

खत व्यवस्थापनाचा अवलंब करून अतिरिक्त खर्च टाळा

Next

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच प्रशाला अविनाश गेडाम हाेत्या. प्रमुख अतिथी म्हणून मडावी ग्रा.पं. सदस्य प्रीती मडावी, अविनाश गेडाम, रूपेश मेश्राम, मंडल कृषी अधिकारी गंगाधर आठवले आदी उपस्थित होते. जमीन सुपीकता निर्देशांकानुसार खताचा वापर करून खताचा अतिरेक टाळावा, असे मंडल कृषी अधिकारी रूपेश मेश्राम यांनी केले.

जमिनीतील जीवाणूंची संख्या वाढविण्याकरिता जीवामृताचा वापर करावा तसेच हिरवळीच्या खतामध्ये बोर, बोरू, धैंचा साष्टवा कमी खर्च येणाऱ्या पिकांचा हिरवळीच्या खतासाठी वापर करावा, असे कृषी पर्यवेक्षक योगेश रणदिवे यांनी सांगितले.

जैविक पद्धतीने कीड नियंत्रणामध्ये फोरमॅन ट्रॅप, चिकट सापळे, पक्षी थांबे, निंबाेळी अर्क, दशपर्णी अर्क यांचा वापर करून रासायनिक कीटकनाशकाचा वापर टाळावा, असे आवाहन कृषी पर्यवेक्षक तडपल्लीवार यांनी केले.

भविष्यातल्या पिढीसाठी जमीन टिकवून ठेवण्यासाठी सेंद्रिय शेतीचा अवलंब करावा, असे प्रगतशील शेतकरी ग्रा.पं. सदस्य अविनाश गेडाम यांनी आवाहन केले.

सुपीकता निर्देशांकानुसार खताचा वापर करून तंत्रशुद्ध शेतीचा अवलंब करावा, असे आवाहन प्रशाला गेडाम यांनी केले.

संचालन कृषी सहायक भाग्यश्री दामकोंडावार यांनी व आभार कल्पना ठाकरे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी माधुरी पारधी यांनी सहकार्य केले. कार्यक्रमाला परिसरातील बहुसंख्य महिला उपस्थित होत्या.

Web Title: Avoid additional costs by adopting fertilizer management

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.