तुडतुड्यांचा प्रादुर्भाव राेखण्यासाठी दाट लागवड टाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2021 04:21 AM2021-07-24T04:21:40+5:302021-07-24T04:21:40+5:30

धान (भात) पिकावर तपकिरी, हिरवे आणि पांढरे तुडतुडे असे तीन प्रकारचे तुडतुडे बागायती पाणथळ क्षेत्रामध्ये आढळून येतात. त्यापैकी तपकिरी ...

Avoid dense planting to control the incidence of thrips | तुडतुड्यांचा प्रादुर्भाव राेखण्यासाठी दाट लागवड टाळा

तुडतुड्यांचा प्रादुर्भाव राेखण्यासाठी दाट लागवड टाळा

Next

धान (भात) पिकावर तपकिरी, हिरवे आणि पांढरे तुडतुडे असे तीन प्रकारचे तुडतुडे बागायती पाणथळ क्षेत्रामध्ये आढळून येतात. त्यापैकी तपकिरी तुडतुडे सर्वात जास्त हानीकारक आहेत. ही कीड पाण्याचा निचरा योग्य प्रमाणात न होणाऱ्या, घन लागवड केलेल्या आणि नत्र खताची मात्रा वाजवीपेक्षा जास्त प्रमाणात दिलेल्या शेतात प्रामुख्याने आढळून येते. त्याचबरोबर २८ ते ३० अंश सेल्सिअस तापमान व ८५ टक्केपेक्षा जास्त आर्द्रता आणि कमी पाऊस या किडीचा प्रादुर्भाव वाढण्यास पोषक ठरतो. तुडतुडे व त्यांची पिले सतत खोडातील अन्नरस शोषून घेतात. त्यामुळे रोपाची पाने पिवळी पडतात. उपद्रव मोठ्या प्रमाणावर असेल तर रोपे वाळतात व जळल्यासारखी दिसतात. शेतात ठिकठिकाणी तुडतुड्यांमुळे करपून गेलेले गोलाकार भाताच्या पिकाचे खळे दिसतात, यालाच ‘हॉपर बर्न’ असे म्हणतात. अशा रोपांना लोंब्या येत नाहीत. त्या आल्याच तर दाणे न भरता पोचट राहतात.

धान राेवणी केल्यानंतर शेतकऱ्यांनी आपल्या पिकाचे नियमित सर्वेक्षण करावे. सर्वेक्षणासाठी प्रत्येक बांधीतील वेगवेगळ्या ठिकाणावरील दहा बुडांचे निरीक्षण करून नमुने घ्यावेत. धानाच्या बुंध्यावरील तुडतुड्यांची संख्या मोजून सरासरी प्रति चूड किती तुडतुडे आहेत, ते माेजून घ्यावेत. १० तुडतुडे प्रति चूड रोवणी ते फुटवे अवस्थेपर्यंत तसेच १० तुडतुडे प्रति चूड फुटवे ते दुधाळ अवस्थेपर्यंत आढळल्यास नियंत्रणाचे उपाय योजावेत.

बाॅक्स

अशी करावी उपाययाेजना...

शेतकऱ्यांनी धान राेपांची लावणी दाट करू नये. दोन ओळीतील अंतर २० से.मी. आणि दोन चुडातील अंतर १५ से.मी. ठेवावे तसेच पट्टा पध्दतीने रोपांची लावणी करावी. नेहमी प्रादुर्भाव होणाऱ्या शेतात नत्र खताची मात्रा वाजवी प्रमाणात द्यावी. शेतातील पाण्याचा निचरा नियमित करावा, पाणी बदलावे. टेहळणीसाठी प्रकाश सापळ्यांचा वापर करावा.

बाॅक्स

नुकसानीनुसार करावी फवारणी

प्रत्येक बुडात १० तुडतुडे या आर्थिक नुकसान पातळीच्या आधारे कीटकनाशकाची फवारणी करावी. यासाठी हेक्टरी १०० लिटर पाण्यात इमिडाक्लोरोप्रीड १७.८ टक्के १२५ मि.लि. किंवा थायामिथाॅन २५ टक्के डब्ल्यूजी १०० ग्रॅम किंवा क्लोथियानिडीन ५० टक्के २५ ग्रॅम किंवा बुप्रोफेजीन २० टक्के व फिप्रोमील ३ टक्के एससी ५०० मि.लि. मिसळून फवारावे किंवा इथोफेनप्राक्स १० टक्के ५०० मि.लि. किंवा फेनोबुकार्य (बी.पी.एम.सी.) ५० टक्के ६०० मि.लि. या प्रमाणात फवारणी करावी. फवारणी करताना कीटकनाशक फुटव्याच्या बुंध्यावर पडेल याची दक्षता घ्यावी. आठवड्‌यानंतर परत प्रादुर्भाव आढळल्यास दोन ते तीन फवारण्या कराव्यात. कीटकनाशके बदलून वापरावीत.

Web Title: Avoid dense planting to control the incidence of thrips

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.