पर्यावरण संरक्षणासाठी पीओपी मूर्ती टाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2021 04:41 AM2021-08-24T04:41:04+5:302021-08-24T04:41:04+5:30

गडचिरोली शहरात अनेक तालुक्यांतून व इतर जिल्ह्यातूनही विक्रीसाठी मोठ्या प्रमाणात मूर्ती येत असतात. यात काहीजण मातीच्या, तर काहीजण पीओपीच्या ...

Avoid POP idols for environmental protection | पर्यावरण संरक्षणासाठी पीओपी मूर्ती टाळा

पर्यावरण संरक्षणासाठी पीओपी मूर्ती टाळा

Next

गडचिरोली शहरात अनेक तालुक्यांतून व इतर जिल्ह्यातूनही विक्रीसाठी मोठ्या प्रमाणात मूर्ती येत असतात. यात काहीजण मातीच्या, तर काहीजण पीओपीच्या मूर्ती ठेवतात; परंतु त्यावर रंग चढविलेले असल्याने कोणत्या मूर्ती मातीच्या व कोणत्या पीओपीच्या हे ग्राहकांना ओळखणे कठीण असते. या मूर्तींचा वापर करणे कायद्याने बंदी असतानाही कोणत्याही प्रकारची कारवाई हाेत नाही. त्यामुळे मूर्तिकारांनीच पीओपी मूर्ती टाळाव्या, असे आवाहन याप्रसंगी करण्यात आले.

यावेळी अंनिसचे अध्यक्ष उद्धव डांगे, सदस्य विलास निंबोरकर, प्रा. देवानंद कामडी, प्रशांत नैताम, मूर्तिकार संघटनेचे जोंंधरू कपाटे, दिलीप ठाकरे, अनिल कोटांगले, भूषण कोटांगले, आत्माराम कोटांगले, रवी कोटांगले, नीलेश कोटांगले, गजू पासांडे, अशोक पातर, प्रवीण कपाटे, राजू ठाकरे, विनय कोटांगले, राजेश पारटवार, भीमराव चव्हाण, विजय कोटांगले, राजेंद्र कोटांगले, गजानन थापनवाडेे, सदाशिव कपाटे, प्रमोद भोगले, राजेश कोटांगले आदी उपस्थित होते.

बाॅक्स

एकाच ठिकाणी मिळणार मूर्ती

गडचिराेली शहरात दरवर्षी विविध ठिकाणी मूर्ती विक्रीसाठी मांडल्या जातात. उत्सवाच्यादिवशी मूर्ती ने-आण करताना नागरिकांना अडचणी येतात. तसेच वाहतूक विस्कळीत हाेते. ही समस्या जाणून यावर्षी सर्व मूर्ती एकाच ठिकाणी मांडण्यात येणार आहेत. यासाठी विशेष पेंडाॅलची साेय केली जाणार आहे. पीओपी मूर्तींना प्रतिबंध घालण्यात आला आहे. त्यामुळे नियम माेडणाऱ्यांवर कारवाई केली जाणार आहे.

Web Title: Avoid POP idols for environmental protection

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.