निवडणूक कर्मचारी मानधनाच्या प्रतीक्षेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2021 08:54 AM2021-02-05T08:54:39+5:302021-02-05T08:54:39+5:30

बाॅक्स.... जिल्ह्यातील ग्रामपंचायतींची झाली निवडणूक - ३२० जिल्ह्यात किती केंद्रांवर झाली निवडणूक - ४३० अधिकारी, कर्मचारी - ४,७८८ बाॅक्स... ...

Awaiting election staff honorarium | निवडणूक कर्मचारी मानधनाच्या प्रतीक्षेत

निवडणूक कर्मचारी मानधनाच्या प्रतीक्षेत

Next

बाॅक्स....

जिल्ह्यातील ग्रामपंचायतींची झाली निवडणूक - ३२०

जिल्ह्यात किती केंद्रांवर झाली निवडणूक - ४३०

अधिकारी, कर्मचारी - ४,७८८

बाॅक्स...

असे मिळते मानधन

राज्य शासनाच्या ८ एप्रिल, २००९च्या शासन निर्णयानुसार लाेकसभा, विधानसभा, तसेच ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक व पाेट निवडणुकीच्या वेळी मतदान व मतमाेजणीच्या कामासाठी नियुक्ती केलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना निवडणूक भत्ता दिला जाताे. या जीआरनुसार मतदान केंद्राध्यक्ष किंवा मतमाेजणी निरीक्षकाला प्रती दिवस २५०, मतदान अधिकार, मतमाेजणी सहायक १७५ रुपये प्रती दिवस व चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांना दिवसाकाठी १०० रुपये दिले जातात. क्षेत्रीय अधिकारी, तसेच क्षेत्रीय दंडाधिकाऱ्यांना ठाेक दराने ८०० रुपये निवडणूक भत्ता शासन नियमानुसार अनुज्ञेय आहे.

बाॅक्स....

काेविडबाबत खबरदारी बाळगली

ग्रामपंचायत निवडणुकीच्या मतदान प्रक्रियेदरम्यान निवडणूक कर्मचाऱ्यांना काेराेना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर आवश्यक ते साहित्य निवडणूक विभागाच्या वतीने उपलब्ध करून देण्यात आले. निवडणूक कर्मचाऱ्यांना मास्क, सॅनिटायझर पुरविण्यात आले. मतदान केंद्राच्या ठिकाणी हँडवाॅशची व्यवस्था करण्यात आली हाेती. विशेष म्हणजे, तहसीलदारांच्या याेग्य नियाेजनामुळे काेविडच्या संदर्भात संपूर्ण खबरदारी घेण्यात आली.

काेट...

निवडणूक आयाेगाकडून प्राप्त निधीतून निवडणूक कर्मचाऱ्यांचे मानधन अदा केले जाते. तहसील कार्यालय स्तरावरून मानधन वाटपाची कार्यवाही केली जाते. मानधन वाटपात दिरंगाई हाेणार नाही.

- भाऊसाहेब चव्हाण, नायब तहसीलदार निवडणूक विभाग

Web Title: Awaiting election staff honorarium

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.