‘आपली कन्या, आपल्या दारी’ उपक्रमातून याेजनांबाबत जागृती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2021 04:36 AM2021-03-21T04:36:31+5:302021-03-21T04:36:31+5:30

भेटीदरम्यान ग्रामस्थांची बैठक घेण्यात आली. उपस्थितांना महिला पोलीस शिपाई शोभा गोदारी, सोनम लांजेवार, सोनाली नैताम यांनी महिलांसाठी शासन राबवत ...

Awareness about the schemes through 'Your daughter, your door' initiative | ‘आपली कन्या, आपल्या दारी’ उपक्रमातून याेजनांबाबत जागृती

‘आपली कन्या, आपल्या दारी’ उपक्रमातून याेजनांबाबत जागृती

Next

भेटीदरम्यान ग्रामस्थांची बैठक घेण्यात आली. उपस्थितांना महिला पोलीस शिपाई शोभा गोदारी, सोनम लांजेवार, सोनाली नैताम यांनी महिलांसाठी शासन राबवत असलेल्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती दिली. तसेच महिला संबंधीचे विविध कायदे सांगितले. कार्यक्रमाप्रसंगी महिलांची संगीत खुर्ची स्पर्धा घेऊन विजेत्यांना प्रोत्साहन बक्षीस देण्यात आले. तसेच सर्वांना खाऊचे वाटप करण्यात आले. विशेष म्हणजे, २० मार्च हा दिवस संयुक्त राष्ट्राद्वारे आंतरराष्ट्रीय आनंद दिन म्हणून साजरा केला जातो. ज्यातून आनंदी राहण्याचा संदेश जगभर दिला जातो. परंतु यापासून अनभिज्ञ असलेल्या महिलांना लाहेरी येथील महिला पोलीस पाहून जणू आपलीच मुलगी आपल्या भेटीला आल्याचा आनंद झाला. मनाेरंजनात्मक स्पर्धांमुळे जणू त्यांनी आंतरराष्ट्रीय दिनच साजरा केला असावा असे वाटले. भेटीदरम्यान अभियान दलाचे नेतृत्व प्रभारी अधिकारी अविनाश गोळेगावकर, ३७ बटालियनचे असिस्टंट कमांडंट संतोष भोसले, शीतला प्रसाद, पाेलीस उपनिरीक्षक विजय सपकाळ, महादेव भालेराव आदींनी केले.

Web Title: Awareness about the schemes through 'Your daughter, your door' initiative

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.