कुंभकोट येथील जत्रेत तंबाखूविक्री बंदीसाठी जनजागृती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2021 04:37 AM2021-01-23T04:37:46+5:302021-01-23T04:37:46+5:30
कोरची : तालुक्यातील कुंभकोट येथे राजमाता देवीची जत्रा २० जानेवारी रोजी भरली. या जत्रेत मुक्तिपथ, गावातील युवक मंडळ व ...
कोरची : तालुक्यातील कुंभकोट येथे राजमाता देवीची जत्रा २० जानेवारी रोजी भरली. या जत्रेत मुक्तिपथ, गावातील युवक मंडळ व वनश्री महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी पुढाकार घेत तंबाखूविक्री बंदीसाठी व्यापक जनजागृती केली. दरम्यान, तिघांकडून तंबाखूजन्य पदार्थ जप्त करून नष्ट करीत खर्रा, तंबाखूची विक्री न करण्याचे आवाहन करण्यात आले. कुंभकोट येथील जत्रेला चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, छत्तीसगड येथील भाविक येतात. राजमाता देवीच्या यात्रेला भाविकांची प्रचंड गर्दी असते. सदर यात्रा तंबाखूमुक्त करण्याचा गावातील युवकांनी निर्धार केला. त्यानुसार मुक्तिपथ, युवा मंडळ व वनश्री कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी तंबाखूचे दुष्परिणाम सांगत तंबाखूजन्य पदार्थांची विक्री न करण्याचे आवाहन यात्रेतील दुकानदारांना केले. दुकानांची तपासणी सुद्धा करण्यात आली असता चोरट्या मार्गाने विक्री करणाऱ्या तिघांकडून तंबाखूजन्य पदार्थ जप्त करून नष्ट करण्यात आला.