आरमाेरी नर्सिंग स्कूलमध्ये काेविडबाबत जागृती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2021 04:25 AM2021-07-02T04:25:17+5:302021-07-02T04:25:17+5:30
या आजारापासून घ्यावयाची काळजी याविषयी विस्तृत माहिती दिली. यावेळी श्री साई स्कूल ऑफ नर्सिंग आरमोरीमध्ये उपस्थित कर्मचारी, ए. एन. ...
या आजारापासून घ्यावयाची काळजी याविषयी विस्तृत माहिती दिली. यावेळी श्री साई स्कूल ऑफ नर्सिंग आरमोरीमध्ये उपस्थित कर्मचारी, ए. एन. एम. आणि जी. एन. एम.च्या विद्यार्थिनींची अँटिजन तपासणी करण्यात आली. जवळपास ५० विद्यार्थ्यांच्या व कर्मचाऱ्यांच्या चाचण्या करण्यात आल्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संचालक सुधाकर साळवे होते. यावेळी प्राचार्या नेहा ओळख, उपजिल्हा रुग्णालय आरमोरीचे प्रयोगशाळा तंत्रज्ञ पिंकेश मेश्राम, परिचारिका नीलिमा अंबादे, साहाय्यक कपिल पत्रे उपस्थित होते. शासनाने वेळोवेळी जारी केलेल्या नियमांचे पालन करून कोरोनाला दूर करण्याकरिता एकत्रित सामूहिक प्रयत्नांची गरज असल्याचे प्रतिपादन सुधाकर साळवे त्यांनी केले. नेहा ओळख यांनी प्रास्ताविक केले, तर चंदा कन्नाके यांनी आभार मानले. यशस्वितेसाठी भूषण ठकार, चंदा कन्नाके, मनीषा बारापात्रे, पूनम नन्नावरे, दीक्षा तिम्मा, स्वप्निल धात्रक, सुनीता हेडाऊ, पिंकी साळवे, केशव शेलोटे, वासुदेव फुलबांधे यांनी सहकार्य केले.
300621\43221721-img-20210630-wa0045.jpg
आरमोरी येथील श्री साई स्कुल ऑफ नर्सिंग येथे कोविड १९ अंतर्गत जनजागृती व चाचणी शिबिरात उपस्थित कर्मचारी