पंतप्रधान मातृवंदना याेजनेची जिल्हाभर हाेणार जनजागृती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2021 04:38 AM2021-09-03T04:38:18+5:302021-09-03T04:38:18+5:30
१ ते ७ सप्टेंबर या कालावधीत पंतप्रधान मातृ वंदना याेजनेबाबत जनजागृती केली जाणार आहे. या कार्यक्रमाला जिल्हा आराेग्य अधिकारी ...
१ ते ७ सप्टेंबर या कालावधीत पंतप्रधान मातृ वंदना याेजनेबाबत जनजागृती केली जाणार आहे. या कार्यक्रमाला जिल्हा आराेग्य अधिकारी डॉ. संजयकुमार जठार, जिल्हा माता व बालसंगाेपन अधिकारी डॉ. समीर बनसोडे, तालुका आराेग्य अधिकारी डॉ. सुनील मडावी, युनिसेफ सल्लागार डॉ. सोनू मेहर, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक डॉ. राहुल ढिंगळे, जिल्हा कार्यक्रम समन्वयक अश्विनी मेंढे, जिल्हा आशा समन्वयक धीरज सेलोटे, जिल्हा कार्यक्रम सहायक चंदू वाघाडे व आरोग्य कर्मचारी उपस्थित होते. पंतप्रधान मातृवंदना याेजनेबाबत नागरिकांमध्ये जागृती व्हावी यादृष्टीने आराेग्य कर्मचाऱ्यांनी प्रयत्न करावे. सर्व नागरिकांना याबाबत माहिती द्यावी, असे आवाहन डॉ. संजयकुमार जठार यांनी याप्रसंगी केले. ‘सुरक्षित जननी विकसित धारणी’या घोषवाक्याने १ सप्टेंबर रोजी सप्ताहाचे उद्घाटन जिल्हा महिला व बाल रुग्णालयात करण्यात आले. कार्यक्रमात मुख्यतः पोषण आहाराविषयी गरोदर व स्तनदा मातांना गरोदरपण पश्चात वाॅर्डात प्रधानमंत्री मातृ वंदना सप्ताह व पोषण आहार सप्ताह या दोन सप्ताहांची सांगड घालून संयुक्त विद्यमानाने कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पाडण्यात आले. आहाराविषयी आहारतज्ज्ञ माधवी पांडे व वैद्यकीय अधिकारी डॉ. पेदाम यांनी मार्गदर्शन केले. आभार आराेग्य पर्यवेक्षक प्रवीण गेडाम यांनी मानले.
बाॅक्स
चार वर्षांत २९ हजार महिलांना लाभ
पंतप्रधान मातृ वंदना योजनेंतर्गत सप्टेंबर २०१७ ते ३१ मार्च २०२२ पर्यंत राज्यस्तरावरून ३१ हजार ४१२ एवढे लाभार्थी उद्दिष्ट जिल्ह्याकरिता प्राप्त झाले आहेत. त्यापैकी ३१ ऑगस्ट २०२१ पर्यंत २९ हजार ८२१ इतके उद्दिष्ट साध्य करण्यात आले आहे. १२ कोटी ७३ लाख ७९ हजार रुपये पात्र महिला लाभार्थ्यांच्या बॅंक खात्यात डीबीटीद्वारे जमा करण्यात आले आहे. म्हणजेच जिल्ह्यात ९५ टक्के उद्दिष्ट साध्य झाले आहे, असे आराेग्य विभागातर्फे कळविण्यात आले आहे. या योजनेचा लाभ घेण्याकरिता आराेग्य कर्मचाऱ्यांशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.