बाेदलीत वैज्ञानिक प्रयाेगातून जागृती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2021 04:36 AM2021-02-16T04:36:55+5:302021-02-16T04:36:55+5:30
चमत्कार सादरीकरणासोबतच सापाविषयी असलेले समज गैरसमज दूर करण्यात आले. हिस्टेरिया, सिझोफेनिया सारखे आजार झालेल्या व्यक्तीचे बोलणे असंबद्ध असतात व ...
चमत्कार सादरीकरणासोबतच सापाविषयी असलेले समज गैरसमज दूर करण्यात आले. हिस्टेरिया, सिझोफेनिया सारखे आजार झालेल्या व्यक्तीचे बोलणे असंबद्ध असतात व काही वेळात नार्मल व्यक्तीसारखे वागू लागतात आणि आपण असे काही केलेच नाही किंवा मला काहीच आठवत नाही असे सांगून इतरांना गोंधळवून टाकतात. खास करून १५ ते ४५ च्या वयोगटातील स्त्रिया या आजाराला बळी पडतात. अशांना भूतबाधा झाल्याचे सांगून काही मांत्रिक त्यांचे लैंगिक शोषण करतात. तर काहीची आर्थिक लूट हाेते. तेव्हा डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार योग्य औषधोपचार सुरू ठेवणे हाच पर्याय असतो, असे मार्गदर्शन करण्यात आले. संचालन राजेंद्र कोडापे तर आभार दिवाकर पिपरे यांनी मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी दिवाकर पिपरे, गुरुदास ढोले, चंद्रकांत निकोडे, निमेश मेश्राम, शर्मानंद, श्याम निकोडे, सूरज मोहुर्ले, अजय निकोडे, पांडुरंग गेडाम, तारा कोडाप, जिजा गेडाम, यशोधरा पंधरे, सपना मडावी, बहिणाबाई मेश्राम, क्षीरसागर कोडाप यांनी सहकार्य केले.