अहेरीत रास्ता रोको आंदोलन
By admin | Published: June 10, 2017 01:38 AM2017-06-10T01:38:46+5:302017-06-10T01:38:46+5:30
शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी यासह इतर मागण्यांसाठी शिवसेनेतर्फे अहेरी शहरात रास्तारोको आंदोलन शुक्रवारी करण्यात आले.
कडक पोलीस बंदोबस्त : पूर्ण कर्जमाफी देण्याची शिवसेनेची मागणी
लोकमत न्यूज नेटवर्क
अहेरी : शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी यासह इतर मागण्यांसाठी शिवसेनेतर्फे अहेरी शहरात रास्तारोको आंदोलन शुक्रवारी करण्यात आले.
आंदोलनाचे नेतृत्व शिवसेना जिल्हा प्रमुख सुरेंद्रसिंह चंदेल, उपजिल्हा प्रमुख अनंत बेझलवार, अविनाश गेडाम, अहेरी तालुका प्रमुख बिरजू गेडाम, मनोज गेडाम, किशोर रामगिरवार, गणेश वट्टे, अनिल सरापवार, राजू मामीडवार, महिला आघाडी उपजिल्हा प्रमुख छाया रामगिरवार, मुक्ता तलांडे यांनी केले.
आंदोलनादरम्यान अहेरीचे नायब तहसीलदार संतोषवार यांनी आंदोलनस्थळाला भेट दिली व निवेदन स्वीकारले. अहेरीचे प्रभारी पोलीस निरिक्षक चांगदेव कोळेकर, पोलीस उपनिरिक्षक बासनवार, झिंगटे यांच्या नेतृत्वात चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.