शैक्षणिक दर्जा सुधारण्यात बबलू हकिम यांचा मोलाचा वाटा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2021 04:41 AM2021-09-22T04:41:16+5:302021-09-22T04:41:16+5:30
भगवंतराव हायस्कूल इंदाराम येथे बबलू हकीम हे मुख्याध्यापक पदावर कार्यरत होते. ३१ ऑगस्ट रोजी ते सेवानिवृत्त झाले. त्यानिमित्त वनवैभव ...
भगवंतराव हायस्कूल इंदाराम येथे बबलू हकीम हे मुख्याध्यापक पदावर कार्यरत होते. ३१ ऑगस्ट रोजी ते सेवानिवृत्त झाले. त्यानिमित्त वनवैभव शिक्षण मंडळाच्या वतीने अहेरी येथे मंगळवारला आयोजित अब्दुल जमीर अब्दुल हकीम ऊर्फ बबलू भैय्या यांच्या सेवानिवृत्ती अभीष्टचिंतन तथा गौरव ग्रंथ प्रकाशन सोहळ्यात अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते.
याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून वनवैभव शिक्षण मंडळाचे संस्थापक सचिव अब्दुल हकीम अब्दुल रहीम, चाचम्मा हकिम, अब्दुल जमीर अब्दुल हकीम, जिल्हा परिषद माजी अध्यक्ष भाग्यश्री आत्राम, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष ऋतुराज हलगेकर, राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा शाहीन हकीम, अबूझमाड शिक्षण संस्था गडचिरोलीचे सचिव मुख्याध्यापक समशेरखान पठाण, वनवैभव शिक्षण मंडळाच्या सदस्य प्राचार्य लीना हकीम, प्रा. जहिर हकीम, प्रा. असमा हकिम, मुख्याध्यापिका जहिरा शेख, मुख्याध्यापक मकसूद शेख, प्राचार्य शैलेंद्र खराती, डॉ. लुबना हकीम, मुश्ताक हकीम, सरफराज आलम आदी उपस्थित होते.
मान्यवरांच्या हस्ते बबलू हकीम यांच्या जीवनावर आधारित ज्ञानवैभव या पुस्तकाचे विमाेचन करण्यात आले. भाग्यश्री आत्राम म्हणाल्या, की बबलू हकीम यांचे व वनवैभव शिक्षण मंडळाचे जेवढे कौतुक करावे तेवढे कमी असून अत्यंत विपरीत परिस्थितीवर मात करून त्यांनी वनवैभव शिक्षण मंडळाला पुढे नेले आहे. समशेरखान पठाण म्हणाले, की बबलू हकीम यांच्यासारखे सोयरे मला लाभले हे माझे भाग्य असून, ते जंटलमन आहेत.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य शैलेंद्र खराती यांनी केले. तसेच संस्थेतर्फे प्राचार्य मंडल, प्राचार्य बेपारी, प्राचार्य गजानन लोणबले यांनी आपले मनोगत व्यक्त केले. मानपत्रवाचन प्रा. डॉ. उरकुडे यांनी केले तर गौरवगीत पुंडलिक कविराजवार यांनी सादर केले. कार्यक्रमाचे संचालन प्रा. डॉ. राज मुसणे व किशोर पाचभाई यांनी केले तर आभार प्राचार्य विठ्ठल निखुले यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी सर्व प्राचार्य, मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.
(बॉक्स)
रिटायर्ड झालो, टायर्ड नाही
सत्काराला उत्तर देताना बबलू हकीम म्हणाले, मी फक्त रिटायर्ड झालो आहे, मात्र टायर्ड झालो नाही, कारण माझे वडील बब्बू हकिम व आई चाचम्मा हकीम यांनी मला जी सामाजिक कार्याची शिकवण दिली आहे. ती आता मी पुढे नेणार असून, वनवैभव शिक्षण मंडळात दरवर्षी आदर्श शिक्षक पुरस्कार देणार असून विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण मिळावे यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले. राष्ट्रपती पुरस्कारप्राप्त शिक्षक खुर्शिद शेख, डॉ. सलुजा यांचा सत्कार करण्यात आला.
210921\img_20210919_134418.jpg
बबलू हकीम यांचा सपत्नीक सत्कार आमदार धर्मरावबाबा आत्राम आणि मान्यवर