पुजाऱ्याकडे घेऊन जाणाऱ्या बाळावर रुग्णालयातच झाले उपचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2021 04:38 AM2021-07-27T04:38:39+5:302021-07-27T04:38:39+5:30

भामरागड तालुक्यातील कोठीटोला येथील रहिवासी सरिता लेकामी ही महिला बाळंतपणासाठी ग्रामीण रुग्णालय भामरागड येथे भरती झाली होती. गेल्या सोमवारी ...

The baby being taken to the priest was treated at the hospital | पुजाऱ्याकडे घेऊन जाणाऱ्या बाळावर रुग्णालयातच झाले उपचार

पुजाऱ्याकडे घेऊन जाणाऱ्या बाळावर रुग्णालयातच झाले उपचार

Next

भामरागड तालुक्यातील कोठीटोला येथील रहिवासी सरिता लेकामी ही महिला बाळंतपणासाठी ग्रामीण रुग्णालय भामरागड येथे भरती झाली होती. गेल्या सोमवारी सरिताने गोंडस बाळाला जन्म दिला. पण बाळाची प्रकृती ठिक नसल्याने तिला भामरागडवरून अहेरी उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. रुग्णालयात जास्त दिवस होत असून आमच्या बाळाची प्रकृती बरी होत नसल्याचे कारण सांगून सरिताचे सासू-सासरे नवजात नातवाला गावाकडच्या पुजाऱ्याकडे घेऊन जाण्याच्या तयारीत होते. ही बाब येथील उपजिल्हा रुग्णालयाचे बालरोगतज्ज्ञ डॉ. तुषार भागवत यांना माहिती होताच त्यांनी माडिया भाषेतील सहकाऱ्याला घेऊन त्यांची समजूत काढली. डॉ भागवत यांच्या प्रयत्नाने सरिताचे सासू-सासरे रुग्णालयातच उपचारासाठी तयार झाले. नवजात अर्भकाच्या पालकांना व नातेवाईकांना पुजाऱ्याकडे न जाऊ देता रुग्णालयातच उपचार करून बरे केले.

अंधश्रद्धेपोटी आदिवासी भागातील अनेक परिवार आजही पुजाऱ्याकडे आपल्या पाल्यांना नेऊन जीव धोक्यात टाकतात आणि प्रकृती जास्त खराब झाल्यावर रुग्णालयात आणतात, मात्र तोपर्यंत उशीर झालेला असतो.

(बॉक्स)

रक्त चढविण्यासाठी डाॅ.भागवत यांचा पुढाकार

बाळाच्या शरीरात रक्त कमी असल्याने रक्ताची आवश्यकता होती. डॉ. भागवत यांनी येथील सामाजिक कार्यकर्ते विकास तोडसाम यांच्याशी संपर्क साधून रक्त उपलब्ध करून दिले. त्यामुळे बाळाच्या प्रकृतीत सुधारणा झाली. मागील दोन वर्षांपासून डॉ. भागवत अहेरी उपजिल्हा रुग्णालयात सेवा देत आहेत. अतिदुर्गम भागातील बांधवांना नागपूर, गडचिरोली, चंद्रपूर येथे जाण्याऐवजी अहेरीतच चांगली सेवा मिळत आहे. त्यामुळे १०० किमी प्रवासाचा शारीरिक, आर्थिक, मानसिक त्रास वाचत आहे.

240721\4601204-img-20210724-wa0035.jpg

सरिता लेकामी व परिवार

Web Title: The baby being taken to the priest was treated at the hospital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.