बाळ वारंवार डायपर ओले करतेय; तातडीने डाॅक्टरांना दाखवा !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2021 04:30 AM2021-07-25T04:30:57+5:302021-07-25T04:30:57+5:30
गडचिराेली : घराबाहेर कुठेही जायचे असेल तर बाळाला डायपर वापरत असल्याने जास्त कपडे जवळ बाळगण्याची गरज नाही. मात्र, बाळ ...
गडचिराेली : घराबाहेर कुठेही जायचे असेल तर बाळाला डायपर वापरत असल्याने जास्त कपडे जवळ बाळगण्याची गरज नाही. मात्र, बाळ वारंवार डायपर ओले करीत असेल तर ते टाइप वन डायबिटीसची अनेकांना माहिती नसते. लहान बालकांमध्ये डायपर ओले करण्याचा प्रकार दिसून येत असल्यास तातडीने डाॅक्टरांना दाखविण्याची आवश्यकता असते.
बाॅक्स...
आईवडिलांना डायबिटीस असेल तर...
बाळाला मधुमेह हाेणार असे नसतेच; मात्र आईवडिलांना डायबिटीस असल्यास त्यांना याची लक्षणे माहिती असतात. तीच लक्षणे बाळात आढळून आल्यास किंवा बाळ अचानक जास्त पाणी पिऊन जास्त लघवी करीत असेल, जास्त खाऊनही त्याचे वजन घटत असेल तर लगेच डाॅक्टरांशी संपर्क साधावा, असे आराेग्य विभागाच्या वतीने सांगण्यात येते.
बाॅक्स...
काय आहेत लक्षणे
बाळ अचानक जास्त प्रमाणात पाणी पिऊन जास्त प्रमाणात लघवीला जात असेल तर हे डायबिटीसचे लक्षण आहे. तसेच अचानक जास्त खायला लागला असेल, मात्र त्यानंतरही त्याचे वजन घटत असेल तर हे सुद्धा डायबिटीसचे लक्षण आहे. विशेष म्हणजे लहान बाळांमध्ये डायबिटीस जास्त आढळत असून त्यासाठी इन्सुलिनच सुरू करावी लागते. विशेषत: दाेन वर्षानंतर बाळामध्ये ही लक्षणे दिसून येतात.
काेट...
बालराेग तज्ज्ञ म्हणतात...
सध्याच्या युगात लहान मुलांची दिनचर्या बदलली असून ते बाहेर खेळणे टाळतात. टीव्ही व माेबाइल बघत बसून असतात. शिवाय जंकफूड, चाॅकलेट आदींचे सेवन त्यांना डायबिटीसकडे नेत आहे. अशावेळी पालकांनी सर्वप्रथम आपल्या पालकांचे जंकफूडचे सेवन बंद करावे, व्यायाम करावा, बाहेर जाता येत नसले तरी घरातच शारीरिक हालचाल हाेणारे खेळ खेळावे.
- डाॅ. प्रशांत चलाख
बालराेग तज्ज्ञ, गडचिराेली
...............
दिवसातून सहा ते आठ वेळा डायपर ओले हाेणे अर्थात लघवी करणे नाॅर्मल आहे. वारंवार डायपर ओले करणे ही लक्षणे एका वर्षात दिसून येत नाही. दाेन वर्षांनंतर ही लक्षणे दिसून येतात. याची लक्षणे उशिरा जाणवल्यास ते आनुवांशिक असू शकते. असे असले तरी डाॅक्टरांकडे जाऊन पालकांनी औषधाेपचार करावा.
- डाॅ. श्रावंती काेल्लुरी
बालराेग तज्ज्ञ, गडचिराेली