स्वयंपाकी महिलांचे उपोषण मागे
By admin | Published: November 18, 2014 10:56 PM2014-11-18T22:56:26+5:302014-11-18T22:56:26+5:30
कामावरून कमी केलेल्या शालेय पोषण आहार शिजविणाऱ्या कर्मचाऱ्यांना पुन्हा कामावर घेण्याचे आश्वासन गटशिक्षणाधिकाऱ्यांनी दिल्यानंतर आमरण उपोषण मंगळवारी मागे घेण्यात आले.
देसाईगंज : कामावरून कमी केलेल्या शालेय पोषण आहार शिजविणाऱ्या कर्मचाऱ्यांना पुन्हा कामावर घेण्याचे आश्वासन गटशिक्षणाधिकाऱ्यांनी दिल्यानंतर आमरण उपोषण मंगळवारी मागे घेण्यात आले.
शालेय पोषण आहार शिजविणाऱ्या कर्मचाऱ्यांना कमी करण्यात येऊ नये, असा शासकीय आदेश असतांनाही बोडधा येथील सुमनबाई येळणे, लाडज येथील सुनिता आनंद धाकडे, देसाईगंज येथील सुमित्रा वामन सोनडवले, कसारी येथील कमल जगन नैताम यांना कामावरून कमी करण्यात आले. या महिलांना आणखी कामावर घेण्यात यावे, या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य शालेय पोषण आहार कर्मचारी युनियन तालुका शाखा देसाईगंजच्या पदाधिकाऱ्यांनी पंचायत समितीसमोर सोमवारपासून आमरण उपोषणाला सुरूवात केली होती. दरम्यान गटशिक्षणाधिकारी बांगर यांनी बोडधा व कसारी येथील स्वयंपाकी महिलांना कामावर घेण्याचे आश्वासन दिले.
नवीन लाडज व कन्या शाळा देसाईगंज येथील महिलांना का कमी करण्यात आले, याबाबतची चौकशी करून कामावर घेण्याचे आश्वासन दिले. त्यामुळे उपोषण मागे घेण्यात आले. सभापती प्रीती शंभरकर यांनी उपोषणकर्त्यांना लिंबूपाणी पाजून उपोषण सोडविले. यावेळी उपसभापती शिवाजी राऊत, धनपाल मिसार उपस्थित होते. (प्रतिनिधी)