३६ ग्रामपंचायतींची राेजगार हमी याेजनेच्या कामाकडे पाठ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2021 04:45 AM2021-06-09T04:45:13+5:302021-06-09T04:45:13+5:30
गडचिराेली : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण राेजगार हमी याेजनेअंतर्गत गडचिराेली जिल्ह्यातील ३६ ग्रामपंचायतींनी काेराेना संकटाच्या काळात स्थानिकस्तरावर कामे सुरू ...
गडचिराेली : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण राेजगार हमी याेजनेअंतर्गत गडचिराेली जिल्ह्यातील ३६ ग्रामपंचायतींनी काेराेना संकटाच्या काळात स्थानिकस्तरावर कामे सुरू केली नाही. त्यामुळे तेथील मजुरांना बेराेजगारीचा सामना करावा लागला.
काेराेना महामारी आटाेक्यात आणण्यासाठी शासनाच्या वतीने दुसऱ्या लाटेदरम्यान दीड महिने लाॅकडाऊन करण्यात आले. दरम्यान जिल्हाबंदीही हाेती. अशास्थितीत गावातील मजूर बाहेर जिल्ह्यात व इतर ठिकाणी राेजगारासाठी जाऊ शकले नाही. अशास्थितीत राेहयाे हा एकमेव आधार मजुरांना हाेता. ४२१ ग्रामपंचायतींनी राेहयाेगीची कामे सुरू करून काेराेना संकटकाळात ४८ हजार मजुरांना राेजगार दिला. मात्र ३६ ग्रामपंचायतींनी राेहयाे कामे सुरू करण्याकडे पाठ दाखविली. या ग्रा.पं.वर पंचायत समिती व जि.प.ची नजर आहे.
काेट...
यावर्षी नवरगाव ग्रामपंचायतीअंतर्गत राेहयाेची कामे सुरू करण्यात आली नाही. आपण नाेंदणीकृत मजूर असून माझ्याकडे जाॅबकार्ड आहे. कामे सुरू न झाल्याने रिकाम्या हाताने राहावे लागले. राेजगार न मिळाल्याने आर्थिक अडचण जाणवली.
- चंदूू महामंडरे, मजूर
.........................
आमच्या गावात यावर्षी महिनाभरापूर्वी मजगीचे काम झाले. या कामातून आम्हा मजुरांना आठ दिवसांचा राेजगार मिळाला. यावर्षी काेराेनाची समस्या असताना सुद्धा राेजगार माेठ्या प्रमाणात उपलब्ध झाला नाही. यापूर्वी दाेन ते तीन वर्षे बरेच दिवस काम मिळाले.
- संदीप आवारी, मजूर
........................
जिल्ह्यातील ४५७ ग्रामपंचायती पैकी ४२१ ग्रामपंचायतीमध्ये काेराेनाकाळात राेजगार हमी याेजनेअंतर्गत माेठ्या प्रमाणात कामे झाली. या कामातून जिल्ह्यातील ४८ हजार मजुरांना राेजगार मिळाला. राेहयाेमध्ये राेजगार निर्मितीत गडचिराेली जिल्ह्याला राज्यातून द्वितीय क्रमांक मिळाला आहे.
-एम.एस.चव्हाण, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक, नरेगा, जि.प.गडचिराेली
........................
वाकडी ग्रामपंचायतीअंतर्गत राेजगार हमी याेजनेची कामे घेण्यात आली. मजगी व शेतातील पाळे टाकण्याच्या कामातून शेकडाे मजुरांना राेजगार प्राप्त झाला. काेराेना संकटात सापडलेल्या मजुरांना राेहयाेच्या माध्यमातून काम मिळाल्याने त्यांना दिलासा मिळाला. काेविडचे नियम पाडून काम पूर्ण केले.
- भाग्यश्री मंगर, सरपंच, वाकडी
........................
राेजगार हमी याेजनेअंतर्गत आमच्या ग्रामपंचायतीच्या वतीने कामे घेण्यात आली. या कामातून नाेंदणीकृत स्थानिक मजुरांना मजगी व नहर दुरूस्तीच्या कामातून राेजगार प्राप्त झाला. त्यांना ऑनलाइन स्वरूपात मजुरीची रक्कमही प्राप्त झाली. आपण याबाबत पं.स.कडे पाठपुरावा केला हाेता.
- भास्कर बुरे, सरपंच, मुरखळा (माल)