शासकीय नाेकरीचा अनुशेष भरून काढणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2020 04:45 AM2020-12-30T04:45:19+5:302020-12-30T04:45:19+5:30
तालुका काँग्रेस कमिटी व महाविकास आघाडीच्या वतीने मंगळवारी कुरखेडा येथे आयोजित नगरपंचायत व ग्रामपंचायत ग्रामीण कार्यकर्ता व चर्चासत्र मेळाव्याचे ...
तालुका काँग्रेस कमिटी व महाविकास आघाडीच्या वतीने मंगळवारी कुरखेडा येथे आयोजित नगरपंचायत व ग्रामपंचायत ग्रामीण कार्यकर्ता व चर्चासत्र मेळाव्याचे आयाेजन करण्यात आले. दरम्यान नागरी सत्काराला उत्तर देताना वडेट्टीवार बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा काॅंग्रेस कमिटीचे अध्यक्ष माजी आमदार डाॅ. नामदेव उसेंडी होते. याप्रसंगी आ. ॲड.अभिजित वंजारी, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अजय कंकडलावार, कुरखेडा, कोरची नगरपंचायत निवडणुकीचे निरीक्षक योगेंद्र भगत, माजी आ.आनंदराव गेडाम यांनी यावेळी मार्गदर्शन केले. यावेळी मंचावर युवक काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे, जि.प. उपाध्यक्ष मनोहर पोरेटी, माजी जि.प. उपाध्यक्ष जिवन नाट, जि.प.सदस्य ॲड. राम मेश्राम, परिवर्तन संघटनेचे अध्यक्ष सुरेंद्रसिंह चंदेल, कुरखेडाचे माजी नगराध्यक्ष डाॅ. महेंद्र मोहबंसी, काँग्रेस तालुकाध्यक्ष जयंत हरडे, कोरची तालुकाध्यक्ष श्यामलाल मडावी, राकाॅंचे जिल्हा सरचिटणीस मनोज अग्रवाल, अयूब खान, प्रभाकर तुलावी, प्रल्हाद कराडे, नगराध्यक्ष आशाताई तुलावी आदी उपस्थित होते. याप्रसंगी कुरखेडा व कोरची येथील भाजपाच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. यावेळी पक्षाचा दुपट्टा देऊन त्यांचे पक्षात स्वागत करण्यात आले.
पुढे बोलताना ना. वडेट्टीवार म्हणाले, कोरोनामुळे राज्याची तिजोरी रिकामी आहे. त्यामुळे विनाअनुदानित शाळेतील प्राध्यापकांना वेतन देऊ शकलो नाही. मात्र पुढील आर्थिक वर्षात प्राध्यापकांना नक्की वेतन मिळणार असल्याची ग्वाही यावेळी दिली. काँग्रेसने तयार केलेल्या देशातील रेल्वे विमानतळ विकण्याचे काम भाजपच्या केंद्र सरकार करीत असल्याची टीका केली. जिल्ह्यातील रेल्वेसाठी केंद्र सरकारने प्रथम आपला अर्धा वाटा दिल्यानंतरच राज्य सरकार अर्धा वाटा देणार आहे. येत्या नगरपंचायतीच्या निवडणुकीत कुरखेडा नगरपंचायतमध्ये बहुमताने काँग्रेसच्या हाती सत्ता दिल्यास राज्य सरकारकडून २५ कोटींचा निधी उपलब्ध करून देणार असल्याचे सांगितले.
कार्यक्रमाचे संचालन महेश हारगुडे, प्रास्ताविक जीवन नाट यांनी तर आभार जयंत हरडे यांनी आभार मानले.
बाॅकस...
आरमाेरीतही जंगी सत्कार
तालुका काॅंग्रेस कमिटी व महाविकास आघाडीतील इतर घटक पक्षाच्या वतीने राज्याचे मदत पूनर्वसन व बहुजन कल्याण मंत्री विजय वडेट्टीवार आणि आ.अभिजित वंजारी यांचा आरमाेरी शहरात जंगी सत्कार करण्यात आला. काॅंग्रेसचे तालुकाध्यक्ष मनाेज वनमाळी यांच्या निवासस्थानी झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी काॅंग्रेसचे ज्येष्ठ नेते सुधीर भातकुलकर हाेते. याप्रसंगी
माजी आ. डॉ. रामकृष्ण मडावी, काॅंग्रेस तालुकाध्यक्ष मनोज वनमाळी, भाकपचे डॉ. महेश कोपुलवार, अमोल मारकवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे अमीन लालानी, काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष तेजस मडावी, काँग्रेस सेवादलाचे जिल्हा अध्यक्ष राजू गारोदे, जि.प.सदस्य मनीषा दोनाडकर, अशोक वाकडे, नगरसेवक मिलिंद खोब्रागडे, दुर्गा लोणारे, निर्मला किरमे, रोशनी बैस, प्राचार्य लालसिंग खालसा, प्रा. साईनाथ अद्दलवार, प्रा. शशिकांत गेडाम, प्राे. ज्ञानेश्वर ठाकरे, विजय सुपारे, नामदेव सोरते, दीपक बेहरे, सतीश धाईत, कृष्णा खरकाटे, मयूर वनमाळी आदी उपस्थित हाेते.
फाेटाे...
ना.विजय वडेट्टीवार यांचा सत्कार करताना डाॅ.रामकृष्ण मडावी, उपस्थित महाविकास आघाडीचे पदाधिकारी.