७ मे च्या शासन निर्णयाविराेधात मागासवर्गीय संघटना आक्रमक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2021 04:37 AM2021-05-18T04:37:55+5:302021-05-18T04:37:55+5:30
कास्ट्राईब कर्मचारी महासंघ जिल्हा शाखा गडचिराेलीच्या वतीने १७ मे राेजी मुख्यमंत्र्यांना जिल्हाधिकारी यांच्यामार्फत निवेदन पाठविले आहे. यात आंदाेलनाचा इशारा ...
कास्ट्राईब कर्मचारी महासंघ जिल्हा शाखा गडचिराेलीच्या वतीने १७ मे राेजी मुख्यमंत्र्यांना जिल्हाधिकारी यांच्यामार्फत निवेदन पाठविले आहे. यात आंदाेलनाचा इशारा दिला आहे. निवेदन देतेवेळी महासंघाचे विभागीय अध्यक्ष राजकुमार घाेडेस्वार, जिल्हाध्यक्ष गंगाधर मडावी, चक्रपाणी कन्नाके, दिगांबर डाेर्लीकर, शशिकांत शंकरपुरे, रवींद्र उईके, अनिल वाघमारे आदी उपस्थित हाेते.
बाॅक्स ...
२० मे राेजी आक्राेश आंदाेलन
७ मे राेजीचा शासन निर्णय मागासवर्गीय अधिकारी व कर्मचाऱ्यांचे मानसिक व आर्थिक खच्चीकरण करणारा असल्याने हा शासननिर्णय रद्द करावा, या मागणीसाठी कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघाच्या वतीने २० मे राेजी आक्राेश आंदाेलन आयाेजित करण्यात आले आहे. या आंदाेलनात सर्व मागासवर्गीय प्रवर्गातील कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या संघटनांनी सहभागी व्हावे. शासनाला आपली ताकद दाखवावी, असे आवाहन कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघाचे जिल्हाध्यक्ष विजय बन्साेड, सरचिटणीस गाैतम मेश्राम, कार्याध्यक्ष सदानंद ताराम, काेषाध्यक्ष जे. टी. हलामी, ज्येष्ठ उपाध्यक्ष नरेंद्र जेंगठे, रमेश मडावी, लक्ष्मण तुलावी, वनिता कन्नाके आदींनी दिला आहे.