गेवर्धा गुरनाेली मार्गाची दुरवस्था
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2021 04:38 AM2021-04-02T04:38:15+5:302021-04-02T04:38:15+5:30
मालेवाडा : कुरखेडा-देसाईगंज राष्ट्रीय महामार्गापासून गेवर्धा ते गुरनाेली या ३ कि.मी. मार्गाची अतिशय दुरावस्था झाली आहे.अरततोंडी महादेवगड या धार्मीक, ...
मालेवाडा : कुरखेडा-देसाईगंज राष्ट्रीय महामार्गापासून गेवर्धा ते गुरनाेली या ३ कि.मी. मार्गाची अतिशय दुरावस्था झाली आहे.अरततोंडी महादेवगड या धार्मीक, निसर्ग पर्यटनस्थळाला जोडणाऱ्या रस्त्याचे एक कि.मी. डांबरीकरण झालेले आहे. उर्वरित दाेन कि.मी. रस्त्याच्या डांबरीकरणाकडे लक्ष द्यायला स्थानिक लोकप्रतिनिधींना सवड मिळत नाही. सती नदीला येणाऱ्या पुरामुळे, गेवर्घा-शिरपूर-खरकाडा मार्ग बंद असतो तेव्हा या रस्याचा उपयोग अन्नधान्य पोहोचविणे, मदतकार्य व संपर्क यासाठी हा रस्ता. हा मार्ग पुरात बुडत नसल्याने गुरनाेली, टेकरीटोला, शिवटोला, अरततोंडी, खरमतटोला, देऊळगाव, शिरपूर, भगवानपूर, वाढोणा या गावांसाठी वरदान ठरतो. अतिप्राचिन रस्याकडे केवळ राजकीय इच्छाशक्तीच्या अभावामुळे दुर्लक्ष होत असून, सामान्य नागरिकांच्या वेळेचा अपव्यय होत आहे. त्यामुळे हा मार्ग दुरुस्त करावा, अशी मागणी आहे.