खराब रस्ते, नक्षलींच्या भीतीने ईव्हीएम मशिन्स निघाल्या हेलिकॉप्टरने

By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2023 11:19 AM2023-05-20T11:19:43+5:302023-05-20T11:20:29+5:30

१९ रोजी हेलिकॉप्टरने ईव्हीएम व अधिकारी सिरोंचा तालुका मुख्यालयी आले. 

Bad roads, fear of Naxalites, EVM machines left by helicopter | खराब रस्ते, नक्षलींच्या भीतीने ईव्हीएम मशिन्स निघाल्या हेलिकॉप्टरने

खराब रस्ते, नक्षलींच्या भीतीने ईव्हीएम मशिन्स निघाल्या हेलिकॉप्टरने

googlenewsNext

कौसर खान -

सिरोंचा (जि. गडचिरोली) : महाराष्ट्र-तेलंगणा सीमावर्ती भागातील अतिसंवेदनशील ठिकाणी खराब रस्ते, नक्षल्यांची भीती यामुळे ग्रामपंचायत पोटनिवडणुकीत प्रशासनाला चांगलीच कसरत झाली. १८ मे रोजी मतदानानंतर पाच ईव्हीएमसह अधिकाऱ्यांनी नजीकच्या पोलिस ठाण्यात मुक्काम केला. १९ रोजी हेलिकॉप्टरने ईव्हीएम व अधिकारी सिरोंचा तालुका मुख्यालयी आले. 

आकस्मिक निधन, अपात्रतेमुळे रिक्त ग्रामपंचायतमधील सदस्य व सरपंचपदासाठी पोटनिवडणूक झाली. नरसिंहपल्ली (ता.सिरोंचा) येथे सदस्यपदाच्या दोन  जागांसाठी, पोचमपल्ली येथे सरपंचपदासाठी मतदान झाले. नरसिंहपल्लीत ७०.७३, तर पोचमपल्लीत ६५.६४ टक्के मतदान झाले. जंगलव्याप्त भागात दळणवळणाची अडचण असल्याने अधिकाऱ्यांनी ईव्हीएमसह पोलिस ठाण्यात मुक्काम केला.
 
१९ मे रोजी सर्वांना घेण्यासाठी गडचिरोलीहून हेलिकॉप्टर पाठवावे लागले. अतिसंवेदनशील गावे व दुर्गम भाग असल्याने येथे मतदानाच्या आदल्या दिवशी ईव्हीएम नेण्यासाठीही हेलिकॉप्टरचा वापर केला होता. २० मे रोजी तहसील   का  मध्ये मतमोजणी करण्यात येईल.

Web Title: Bad roads, fear of Naxalites, EVM machines left by helicopter

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.