खराब रस्त्यांचा बसगाड्यांना फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2021 08:54 AM2021-02-05T08:54:48+5:302021-02-05T08:54:48+5:30

एटापल्ली : एटापल्ली -आलापल्ली या ३० किमी मार्गाची माेठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. याचा माेठा फटका एसटी महामंडळाला बसत ...

Bad roads hit buses | खराब रस्त्यांचा बसगाड्यांना फटका

खराब रस्त्यांचा बसगाड्यांना फटका

googlenewsNext

एटापल्ली : एटापल्ली -आलापल्ली या ३० किमी मार्गाची माेठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. याचा माेठा फटका एसटी महामंडळाला बसत आहे. एसटी नादुरुस्त हाेण्याचे प्रमाण वाढले आहे. एटापल्ली -आलापल्ली हा तालुक्यातील मुख्य मार्ग आहे. या मार्गावरून बस, प्रवाशी व मालवाहू वाहनांची रात्रंदिवस वर्दळ राहते. मात्र या मार्गाची मागील अनेक वर्षांपासून दुरुस्ती करण्यात आली नाही. निविदा काढल्याचे सांगितले जाते. मात्र अजूनपर्यंत कामाला सुरवात झाली नाही. या मार्गावरून अहेरी आगाराच्या अनेक बसेस धावतात. मार्ग चांगला नसल्याचा फटका या बसेसला बसत आहे. मार्गावरच नादुरुस्त हाेण्याचे प्रमाण वाढत चालले आहे. मंगळवारी खराब रस्त्यामुळे गडचिराेली-अहेरी बसचे टायर फुटले. टायर बदलविण्यासाठी बसमध्ये जॅक नसल्याने वाट बघावी लागली. ताेपर्यंत वाहन त्याच ठिकाणी थांबले हाेते. बसमधील प्रवाशांना दुसऱ्या बसने पाठविण्यात आले.

Web Title: Bad roads hit buses

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.